India vs Sri Lanka 1st ODI 2023: भारतीय टीम घरच्या मैदानात 12 मॅच खेळणार आहे. याचाच श्रीगणेशा भारत-श्रीलंका वन डे सीरिजने (Ind vs SL ODI) होणार आहे. भारतीय टीमचा सलामीचा सामना आज गुवाहाटीत रंगणार आहे. टी-20 मध्ये विश्रांती दिलेल्या रोहित आणि विराट कोहली (Virat kohli) वन डे मध्ये खेळणार आहे. मात्र, डावाची सुरुवात कोण करणार आहे, याची उत्सुकता आहे. गिल की इशान, आज कोण ओपनिंग करणार, असे कप्तान रोहित शर्माला (Rohit Sharma) विचारण्यात आल्यानंतर त्याचे उत्तर चमत्कारीत होते. म्हणाला- माझे नशीब वाईट आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडेच द्विशतक झळकावून खळबळ माजवणाऱ्या इशान किशन याला श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत खेळण्याची संधी मिळणार नाही. त्याच्याशिवाय टी-20 मध्ये झंझावाती शतक झळकावून टीम इंडियाला विजय मिळवून देणाऱ्या सूर्यकुमार यादवलाही वनडे संघात स्थान मिळालेले नाही. कर्णधार रोहित शर्मा याने ही माहिती दिली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना गुवाहाटी येथे होणार आहे.


गुवाहाटीचं मैदान या दोघांसाठी लकी मानलं जात आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये याच मैदानावर दोघांनी विंडीजविरुद्ध सेंच्यूरी ठोकली होती. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बाहेरच आहे. शमीच्या कमबॅकमुळे मात्र टीमला दिलासा मिळाला आहे. टी-20 त शानदार कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमारऐवजी प्लेईंग इलेव्हनमध्ये श्रेयस अय्यरला संधी मिळण्याची शक्यता आहे.


सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्मा याने सांगितले की, शुभमन गिल (नाव घेतले) आणि श्रेयस अय्यर ( संकेत दिले ) यांना येत्या 6 एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळण्याची संधी दिली जाईल. रोहित म्हणाला, 'इशान किशन आणि शुभमन गिल या दोन्ही सलामीच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. दोघांची कामगिरी पाहता गिल याला चांगली कामगिरी करण्याची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


शुभमन गिल का?


शुभमन गिल याचा प्लस पॉईंट असा आहे की त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे, ती त्याच्या बाजूने आहे. त्याने गेल्या 13 डावात 57 पेक्षा जास्त सरासरीने 687 धावा केल्या आहेत. गिलने 99 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने या 687 धावा केल्या आहेत. याबाबत रोहित शर्मा याने सांगितले की, 'गेल्या काही सामन्यांमध्ये गिलने चांगल्या धावा केल्या आहेत, ईशाननेही चांगला खेळ केला आहे. मला ईशानकडून श्रेय घ्यायचे नाही. त्याने संघासाठी चमकदार कामगिरी केली, द्विशतकही झळकावले. मला माहित आहे की द्विशतक करण्यासाठी काय करावे लागते, ही एक मोठी उपलब्धी आहे.


इशानलाही संधी मिळेल


रोहित शर्मा यांनी सांगितले की, 'चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंशी प्रामाणिक राहून, आधी या खेळाडूंना पुरेशी संधी द्यावी लागेल.' मात्र, रोहित शर्मा याने सांगितले की, क्रिकेट विश्वचषकापूर्वी संघाला 15 वनडे खेळायचे असल्याने इशान किशनलाही संधी मिळेल. पुढे रोहित म्हणाला, 'आम्ही ईशानला खेळवू शकणार नाही हे आमचे दुर्दैव आहे. गेल्या काही महिन्यांचा विचार करता गिलने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे, त्यामुळे त्याला संधी देणे योग्य ठरेल. मात्र, ईशान टीम प्लानचा एक भाग राहील.


रोहितने स्पष्टपणे सांगितले की, फॉर्मसोबतच फॉरमॅटही महत्त्वाचा आहे, त्यामुळे या फॉरमॅटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी मिळेल. येथे त्याने श्रेयस अय्यरचे नाव न घेता प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्याचे संकेत दिले आहेत.