कोलंबो : टीम इंडियाने श्रीलंकेचा दुसऱ्या वनडे सामन्यात (india vs sri lanka 2nd odi) श्रीलंकेवर 3 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने 2-0 च्या एकतर्फी फरकाने मालिका खिशात घातली. या मालिका पराभवानंतर श्रीलंकेला आयसीसीने (ICC) दणका दिला आहे. श्रीलंकेने या दुसऱ्या वनडेत ओव्हर रेट कायम (slow over rate) राखला नाही. त्यामुळे आयसीसीने श्रीलंकेला दंड ठोठावला आहे. आयसीसीने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.  (india vs sri lanka 2nd odi icc fined for sri lanka due to slow over rate) 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसीने श्रीलंकेवर एकूण सामन्याच्या मानधनाच्या 20 टक्के रक्कम दंड म्हणून ठोठावली आहे. तसेच आयसीसी वर्ल्ड कप सुपर लीगमधून 1 पॉइंटही कापण्यात आला आहे. सामनाधिकारी रंजन मदुगले यांनी ही कारवाई केली आहे.


आयसीसीच्या नियमांनुसार ठराविक वेळेत काही ओव्हर्सचं खेळ होणं अपेक्षित असतं. पण श्रीलंकेला तो ओव्हर रेट कायम ठेवता आला नाही. श्रीलंकेने ठराविक वेळेत ठरलेल्या ओव्हर्सपैकी 1 ओव्हर कमी टाकली. हे सामनाधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी कारवाईचा बडगा उचलला.


चहरचा कहर अन् भारताचा विजय


रंगतदार झालेल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 3 विकेट्सने पराभव केला. श्रीलंकेने भारताला विजयासाठी 276 धावांचे आव्हान दिले होते. भारताने हे आव्हान 7 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.  7 बाद 193 अशी टीम इंडियाची नाजूक स्थिती  झाली होती. भारताला 14.5 ओव्हरमध्ये विजयासाठी 83 धावांची आवश्यकता होती. तेव्हा दीपक चाहर टीम इंडियाचा तारणहार ठरला. दीपकने 69 चेंडूत 82 धावांची खेळी केली.  


दरम्यान उभयसंघातील तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना हा 23 जुलैला होणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाला श्रीलंकेचा 3-0 असा एकतर्फी पराभव करण्याची संधी आहे. तर श्रीलंकेचा अखेरचा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे.