मुंबई : क्रिकेट विश्वात एक अनोखी घटना घ़डली आहे. या घटनेत एका संघाचे 8 खेळाडू एकेरी धावसंख्येवर आऊट झाल्याची घटना घडलीय.विशेष म्हणजे हे खेळाडू एकेरी धावसंख्या करूनही आऊट झाले तरी संघ ऑल आऊट झाला नाही. त्यामुळे नेमका हा कोणता सामना होता? कोणत्या संघाची अशी अवस्था झाली होती, हे जाणून घेऊयात. 
 
वुमेन्स आशिया कपमध्ये टीम इंडिया आणि श्रीलंकेत फायनल सामना खेळवला जात आहे.या सामन्यात श्रीलंका प्रथम फलंदाजीला उतरली होती. मात्र श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही. टीम इंडियाच्या गोलंदाजानी उत्कृष्ट गोलंदाजी करत श्रीलंकेला एका मागून एक धक्के द्यायला सुरुवात केली. यामुळे श्रीलंकेचा संघ पुर्णत ढेपाळला. श्रीलंकेचे 8 खेळाडू एकेऱी धावसंख्येवर आऊट झाले. मात्र तरीही संघ ऑल आऊट झाला नाही हे विशेष. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे ही वाचा : India vs Sri Lanka: टीम इंडियाने सातव्यांदा कोरलं Asia Cup वर नाव


प्रथम फलंदाजीला उतरलेल्या श्रीलंकेची सुरूवात चांगली झाली नाही. श्रीलंकेची चामरी आटापठू 6, अनुष्का संजीवनी 2,  हरशिष्ठा समराविख्रमा 1, निलाष्की सिल्वा 6, कविशा दिलहरी 1, सुगंदिका कुमारी 6, हसिनी परेरा, मालशा शेहानी शुन्य धावा करून आऊट झाल्या. इनोका राणाविरा 18 आणि ओषाठी राणासिंघे 13 या दोघांनी दुहेरी धावसंख्या गाठली. अचिनी कुलासुरीया 6 वर नाबाद राहीली. 


या धावसंख्येच्या बळावर श्रीलंकेने 9 विकेट गमावून 65 धावा गाठल्या. श्रीलंकेकडून इनोका राणाविरा 18 अशी सर्वाधिक धावा केल्या. 


टीम इंडियाला आता आशिया कपचा फायनल सामना जिंकण्यासाठी 66 धावांची गरज आहे. टीम इंडिया ही धावसंख्या पुर्ण करून आशिया कपवर नाव कोरू शकतो.