मुंबई : कपिल देव सारखा अष्टपैलू खेळाडू तयार होणं ही थोडी अवघडचं गोष्ट आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक जाणकारांच्या मते अजूनही कोणता खेळाडू कपिल देवला रिप्लेस करू शकला नाही. 


भारतीय क्रिकेट संघातही अनेकांमध्ये कपिल देवसारखे बनण्याची इच्छा आहे. पण त्यासोबतीने खेळामध्ये बदल आणि मेहनत करणंदेखील गरजेचे आहे. 


श्रीलंकेवर मात 


आज भारताने श्रीलंकेवर एकदिवसीय सामन्यामध्ये मात करत तीन मॅचेसची सीरिजही २-१ ने जिंकली आहे. ही भारताने सलग जिंकलेली आठवी सीरीज आहे. 


कपिल देवनंतर हार्दिक पांड्या  


कपिल देव हे उत्तम फलंदाज आणि सोबतच गोलंदाजही होते. त्यांना क्रिकेटमध्ये समतोल राखणं जमत होते. मात्र त्यांच्या एका रेकॉर्डच्या पाऊलावर पाऊल ठेवत हार्दिक पांड्या पुढे चालला आहे.  


काय आहे रेकॉर्ड  


आज १९८६ प्रमाणेच एक रेकॉर्ड झाला आहे. ३१ वर्षांपूर्वी कपिल देव यांच्या नंतर हा रेकॉर्ड करणारा हार्दिक हा दुसरा भारतीय खेळाडू आहे.  


जुलै २०१७ मध्ये श्रीलंके विरोधात डेब्यू करणारा हार्दिक पांडा त्यांच्या खेळामुळे संघातील स्थान पक्क करत आला आहे. आज पांड्याने २०१७ मधील ३० वी विकेट घेतली आहे.  


कपिल देव यांनी एका वर्षामध्ये ५०० धावा आणि  ३० हून अधिक विकेट्स घेतल्या होत्या. कपिल देवनंतर ३० हून अधिक विकेट्स घेणारा पांड्या हा दुसरा खेळाडू ठरला आहे. 


कपिल देव यांनी १९८६ साली २७ मॅचेसमध्ये ५१७ धावा केल्या होत्या. दरम्यान कपिल देव यांचा सर्वोत्तम खेळ म्हणजे ३० धावा देऊन ४ विकेट्स घेणं असा होता. तर हार्दिक  पांड्याचा बेस्ट परफॉर्मन्स २०१७ सालातील ३१ विकेट्सचा आहे. यामध्ये त्याने ४० धावा देत ३ विकेट्स घेतल्या तर हार्दिकच्या ५५७ धावा झाल्या आहेत.