IND vs SL : श्रेयस अय्यर-रवींद्र जडेजावर मोठा अन्याय, पाहा नेमकं काय घडलं
ICC कडून मोठा सन्मान होऊनही श्रेयस अय्यरवर श्रीलंके विरुद्धच्या सामन्यात मोठा अन्याय
मुंबई : टीम इंडियाने श्रीलंका संघाचा दारूण पराभव केला आहे. दुसरा कसोटी सामना 238 धावांनी जिंकून सीरिजवरही आपलं नाव कोरलं. कर्णधार रोहित शर्माची विजयी घोडदौड सुरूच आहे. आधी टी 20 आणि नंतर कसोटी दोन्ही सीरिजवर श्रीलंके विरुद्ध विजय मिळवला आहे. सीरिजमध्ये 2-0 ने टीम इंडिया सीरिज जिंकली.
श्रीलंके विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात हैराण करणारी गोष्ट म्हणजे मॅन ऑफ द सीरिजसाठी ज्या क्रिकेटपटूची निवड करण्यात आली त्यावरून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. मॅन ऑफ द सीरिज निवडताना ऋषभ पंतची निवड करण्यात आली. तर श्रेयस अय्यर आणि जडेजाचं नाव कुठेच नव्हतं.
अय्यर-जडेजासोबत अन्याय
श्रीलंकेविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत जडेजानं सर्वात जास्त धावा केल्या. जडेजानं पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात 201 तर जडेजानं 10 विकेट्स घेतल्या आहेत. श्रेयस अय्यरची कामगिरी देखील उत्तम होती. मात्र सोयीस्करपणे या दोघांना बाजूला करून पंतला का हा मान देण्यात आला असा प्रश्न विचारला जात आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत अय्यरने एकूण 186 धावा केल्या. श्रेयस अय्यरपाठोपाठ पंतने धावा केल्या आहेत. पंतने 185 धावा केल्या मग असं असताना पंतला मॅन ऑफ द सीरिज का असा संतप्त नेटकऱ्यांनी प्रश्न विचारला आहे.
पंतची रोहितकडून पाठराखण
संपूर्ण सामन्याचं रुप बदलून टाकण्याची पंतकडे ताकद आहे. अवघ्या 40 मिनिटांत तो संपूर्ण सामना पलटवू शकतो असं रोहितने सांगितलं. पंतचं विकेटकीपिंग उत्तम आहे. प्रत्येक सामन्यात तो स्वत:मध्ये अधिक चांगले बदल करताना दिसत आहे. त्याने जे जे DSR घ्यायला लावते ते त्याचे निर्णयही योग्य होते.
ऋषभ प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करत आहे. पंतला आम्ही त्याच्या बॅटिंगसाठी स्वातंत्र्य दिलं आहे. तो त्यामध्येही हळूहळू माहीर होईल असा विश्वास रोहित शर्मानं व्यक्त केला आहे.
जडेजामुळे टीमला एक उत्तम आधार आणि मजबूती मिळाली आहे. त्याच्या गोलंदाजीचा फायदा टीम इंडियाला होत आहे. श्रेयस अय्यरने आपला टी 20 चा फॉर्म कायम ठेवला आहे. रहाणे आणि पुजाराच्या जागी टीम इंडियामध्ये खेळायला मिळणं ही खूप मोठी जबाबदारी आहे हे श्रेयसला माहीत होतं. त्यामुळे त्याने ही जबाबदारी अत्यंत उत्तम प्रकारे पार पडली असं रोहित शर्माने सांगितलं आहे.