धोनीच वेगळेपण पुन्हा एकदा आलं समोर
श्रीलंके विरूद्धच्या सामन्यात रविवारी भारताने उत्तम खेळ दाखवत वन डे सिरीजमध्ये ५-० अशा पद्धतीने विजय मिळवला. चार वर्षातील हा तिसरा वन डे सामना होता जिथे कॅप्टन विराट कोहलीच्या नेतृत्वमध्ये भारतीय टीमने ५-० च्या क्लिन स्विपने विजय मिळवला.
नवी दिल्ली : श्रीलंके विरूद्धच्या सामन्यात रविवारी भारताने उत्तम खेळ दाखवत वन डे सिरीजमध्ये ५-० अशा पद्धतीने विजय मिळवला. चार वर्षातील हा तिसरा वन डे सामना होता जिथे कॅप्टन विराट कोहलीच्या नेतृत्वमध्ये भारतीय टीमने ५-० च्या क्लिन स्विपने विजय मिळवला.
तर तिथेच माजी कर्णधार कॅप्टन कूल धोनीने असं काही केलं ज्यामुळे पुन्हा एकदा त्याने साऱ्यांची मनं जिंकली आहेत. धोनी कायमच बेस्ट फिनिशर म्हणून ओळखला जातो. मॅच जिंकवून देण्याची वेळ जेव्हा धोनीवर येते तेव्हा तो अगदी हटके स्टाइलने खेळ संपवतो, आणि ही त्याची खासियतच आहे.
अनेकदा धोनी मॅच संपवताना सिक्सर मारतो ज्यामुळे पाहणाऱ्यांनाही तो सामना अतिशय रोमांचक वाटतो. असाच काहीसा सामना रविवारी देखील झाला. जिंकण्यासाठी फक्त २ धावांची आवश्यकता होती. तेव्हा धोनी सिक्सर मारून हा सामना अतिशय सोप्या पद्धतीने संपवू शकत होता. मात्र त्याने असं न करता धोनीने एक रन घेऊन कोहलीला बॅटिंग करण्याची संधी दिली. आणि कोहली गेम फिनिशर बनेल अशी वेळ आणून दिली. आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विराट कोहली आपली ३० वी वन डे सेंच्युरी या अगोदरच पूर्ण करून झाला आहे. विराटने ११५ बॉलमध्ये १०९ धावा केल्या. असं असलं तरीही कोहलीने त्याला गेम फिनीशरची संधी दिली. आणि धोनीच्या स्वभावातील हे वेगळेपण पुन्हा एकदा समोर आलं आहे.