इंदूर : भारत आणि श्रीलंका यांच्यातली गुवाहाटीची पहिली टी-२० मॅच पावसामुळे रद्द झाली. आता या सीरिजची दुसरी टी-२० आज इंदूरमध्ये खेळवण्यात येणार आहे. ३ टी-२० मॅचची ही सीरिज असल्यामुळे आजच्या मॅचमध्ये जी टीम जिंकेल ती सीरिज गमावणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुवाहाटीच्या टी-२० मॅचमध्ये बुमराह आणि शिखर धवन दुखापतीनंतर पुनरागमन करणार होते, पण पाऊस आणि ओल्या खेळपट्टीमुळे या दोघांचं पुनरागमन लांबलं. आता इंदूरच्या मॅचमध्ये हे दोघं मैदानात दिसतील. पहिल्या मॅचमध्ये टॉस झाला होता, पण टॉस झाल्यानंतर पावसाला सुरुवात झाली.


पहिल्या टी-२० मध्ये भारताने संजू सॅमसनला संधी दिली नव्हती, त्यामुळे दुसऱ्या टी-२०मध्येही सॅमसन खेळण्याची शक्यता कमी आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची सीरिज संपल्यानंतर मोठ्या विश्रांतीनंतर भारतीय टीम पुन्हा मैदानात उतरणार आहे.


इंदूरच्या या मैदानात भारताने एकच टी-२० मॅच खेळली आहे. २२ डिसेंबर २०१७ ला झालेल्या या मॅचमध्ये भारताचा ८८ रननी विजय झाला होता. या मॅचमध्ये रोहित शर्माने शतक केलं होतं. भारतानेही टी-२० क्रिकेटमधला त्यांचा सर्वाधिक स्कोअर २६० रन केले होते.


श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी रोहित शर्माला आराम देण्यात आला आहे. रोहितच्या अनुपस्थितीत शिखर धवन आणि केएल राहुल ओपनिंगला बॅटिंग करणार आहेत.


भारतीय टीम


विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, संजू सॅमसन, मनिष पांडे, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर


श्रीलंकेची टीम


लसिथ मलिंगा (कर्णधार), धनंजय डिसिल्वा, वानिंडू हसारंगा, निरोशन डिकवेला, ओशाडा फर्नांडो, अविश्का फर्नांडो, दनुष्का गुणतिलका, लाहिरु कुमारा, एंजलो मॅथ्यूज, कुशल मेंडिस, कुशल परेरा, भानुका राजपक्षा, कासुन राजिथा, लक्षण संदकाना, दासुन शनका, इसरु उडाना