नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टेस्टला येत्या शनिवारपासून सुरुवात होत आहे. कोलकात्यामधली पहिली टेस्ट ड्रॉ झाल्यानंतर नागपूरच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा विजय झाला. आता तिसऱ्या टेस्टमध्येही भारत विजयी झाला तर ऑस्ट्रेलियाच्या विश्वविक्रमाशी विराट सेना बरोबरी करेल.


ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे विश्वविक्रम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली टेस्ट जिंकली तर लागोपाठ ९ टेस्ट सीरिज जिंकण्याच्या विश्वविक्रमाची भारत बरोबरी करेल. याआधी ऑस्ट्रेलियानं २००५ ते २००८मध्ये ऑस्ट्रेलियानं हा रेकॉर्ड केला होता. श्रीलंकेविरुद्धची सीरिज जिंकल्यावर भारत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावेळी ऑस्ट्रेलियाचं रेकॉर्ड तोडण्याची संधी भारताला उपलब्ध आहे.


२०१५पासून भारत अजिंक्य


२०१५ साली भारतानं श्रीलंकेला त्यांच्या घरच्या मैदानावर २-१नं हरवलं. तेव्हापासून भारतानं लागोपाठ ८ सीरिज जिंकल्या आहेत. भारतानं दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, बांग्लादेशला घरच्या मैदानात लोळवलं तर वेस्ट इंडिजला त्यांच्याच घरच्या मैदानात धूळ चारली. तर २०१७मध्ये भारतानं पुन्हा एकदा श्रीलंकेला त्यांच्या घरच्या मैदानात ३-०नं व्हाईट वॉश केलं.