Women`s Asia Cup : `म्हारी छोरियां छोरों से कम हैं के`, महिला क्रिकेटर्सनी पुरूष संघाच्या रेकॉर्डशी साधली बरोबरी
पोरी नुसत्या जिंकल्या नाहीत, तर आशिया कप उंचावून टीम इंडियाच्या पुरूष संघालाच दिलं मोठं आव्हान
मुंबई : वुमेन्स आशिया कपवर (Women's Asia Cup) टीम इंडियाच्या (Team India) महिला संघाने नाव कोरले आहे. या विजयासह महिला संघाने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. टीम इंडियाच्या महिला संघाने हा विजय मिळवून सातव्यांदा आशिया कपवर नाव कोरले आहे. विशेष म्हणजे जे रोहित (Rohit sharma) ब्रिगेडला जमलं नाही, ते कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखाली टीम इंडियाने करून दाखवले आहे.त्यामुळे टीम इंडियाच्या महिला संघाचं आता सर्वत्र कौतूक होत आहे.
रोहित ब्रिगेडचा घेतला बदला
रोहित ब्रिगेडचा (Rohit sharma) पराभव करून आशिया कपमधून बाहेरचा रस्ता दाखवणाऱ्या श्रीलंकेच्या (Sri lanka) महिला संघाचा टीम इंडियाच्या (Team India) महिला संघाने पराभव केला आहे. महिला संघाने 8 विकेट आणि 69 बॉल राखून हा मोठा विजय मिळवला आहे. या विजयासह महिला संघाने रोहित ब्रिगेडचा एकप्रकारे बदलाच घेतला आहे.
हे ही वाचा : टीम इंडियाने सातव्यांदा कोरलं Asia Cup वर नाव
पुरुष संघाला आव्हान
श्रीलंकेचा (Sri lanka) पराभव करत टीम इंडियाच्या (Team India) महिला संघाने 7 व्यांदा आशिया कप उंचावला आहे. या विजयासह महिला संघाने टीम इंडियाच्या पुरूष संघाच्या रेकॉर्डशी बरोबरी साधली आहे. महिला संघाचे हे 7 वे आशिया कप (Women's Asia Cup) विजेतेपद आहे. तर टीम इंडियाच्या पुरुष संघाने देखील केवळ 7 वेळा आशिया कपचे विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे महिला संघाने पुरुष संघाच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.
आशिया कप (Women's Asia Cup) स्पर्धेत महिला संघाचा अधिक दबदबा दिसून आला आहे, कारण त्यांनी 8 पैकी 7 वेळा विजेतेपद पटकावले आहे. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी त्यांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. या विजयाने आमचा महिला संघ पुरुष संघापेक्षा कमी नसल्याचे दिसून येत आहे.
हे ही वाचा : India vs Sri Lanka: क्रिकेटमध्ये अनोखा विक्रम! 8 खेळाडू एकेरी धावसंख्येवर OUT
इतिहास काय?
वुमेन्स आशिया कपला (Women's Asia Cup) 2004 साली सुरुवात झाली होती. त्यावेळी भारतीय महिला संघ आणि श्रीलंका (Sri lanka) यांच्यात पाच सामन्यांची मालिका खेळली गेली. या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 5-0 ने पराभूत करून विजेतेपद पटकावले होते.यानंतर 2008 पर्यंत चारही स्पर्धांमध्ये भारतीय महिलांचा दबदबा दिसून आला आणि विजेतेपद पटकावले होते.
2012 मध्ये प्रथमच ही स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि येथेही भारताने बाजी मारली होती. यानंतर 2018 मध्ये बांगलादेशने भारतीय संघाचा पराभव करून प्रथमच विजेतेपद पटकावले होते. या विजयासह आशिया कप (Women's Asia Cup) जिंकणारा तो दुसरा संघ ठरला होता. त्यानंतर आता 2022 च्या आशिया कपवर टीम इंडियाच्या (Team India) महिला संघाने नाव कोरले आहे.
कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) तिसऱ्यांदा हा आशिया कप उंचावला आहे. या आशिया कपच्या (Women's Asia Cup) विजयानंतर आता महिला संघाचे सर्वत्र कौतूक होत आहे.