रोहित शर्माची आशियामध्ये षटकारांंची शंंभरी झाली पूर्ण ! पण `हे` २ रेकॉर्ड्स हुकलेच
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ८ विकेट्सनी दणदणीत विजय झाला आहे.
मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ८ विकेट्सनी दणदणीत विजय झाला आहे.
शिखर धवनचं नाबाद शतक आणि श्रेयस अय्यरच्या ६५ रन्सच्या खेळीमुळे भारतानं श्रीलंकेवर मात केली आहे. सोबतच भारताने सीरीजही जिंकली आहे. ही भारताने सलग जिंकलेली आठवी वनडे सीरिज आहे.
रोहित शर्माच्या षटकारांची शंभरी
मोहालीतील एकदिवसीय सामन्यांमध्ये दुहेरी शतकं ठोकणारा रोहित शर्मा आज अवघ्या ७ धावांवर आऊट झाला. मात्र आज त्याने लगावलेल्या एका षटकारामुळे आशियात रोहित शर्माची षटकारांची शंभरी मात्र पूर्ण झाली आहे.
आज अकीला धनंजयच्या बॉलवर रोहितने सिक्सर ठोकला. ९४ मॅच आणि ९२ खेळांमध्ये रोहितने षटकारांची शंभरी पूर्ण केली आहे.
आशियामध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड शाहीद आफ्रिदीच्या नावावर आहे. त्याने २०५षटकार लगावले आहेत. तर त्यापाठोपाठ एम धोनीने १५४ षटकार ठोकले आहेत.
डेविड वॉर्नरच्या रेकॉर्डपासून दूर
रोहित शर्माने आज १०० षटकार पूर्ण केले असले तरीही तो दोन रेकॉर्ड्सपासून दूर राहिला आहे. आज २०१५ पासून आजपर्यंत रोहितने ११ शतकं झळकावली आहेत. मात्र ऑस्ट्रेलियाचा ओपनर डेविड वॉर्नरच्या नावावर १२ शतकं झळकावल्याचा रेकॉर्ड आहे.
कॅलेंडर इयरमध्ये सर्वाधिक छक्के लगावण्याचा रेकॉर्ड
रोहित शर्माने एका कॅलेंडर वर्षामध्ये सर्वाधिक षटकारांचे अर्धशतक हा रेकॉर्डही करू शकला नाही. एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार लगावण्याचा रेकॉर्ड दक्षिण आफ्रिकेच्या एबि डिविलियर्सकडे आहे. त्याने २०१५ साली ५८ षटकार लगावले होते. त्यापाठोपाठ शाहिद आफ्रिदीने ४८ आणि रोहितने ४६ षटकार लगावले आहेत.