मुंबई : वेस्ट इंडिज विरुद्ध रविवारी दुसरा वन डे सामना झाला. या सामन्यात अक्षर पटेलने धमाकेदार खेळी केली. त्याच्या वादळी खेळीनं टीम इंडियाला विजय मिळाला. या सामन्यातील एक फोटो व्हायरल झाला आणि त्यानंतर मात्र दीपक हुड्डा आणि BCCI ला सोशल मीडियावर तुफान ट्रोल करण्यात आलं.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी खेळल्या गेलेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात प्रकार घडला. या सामन्यात दीपक हुड्डाने आपली जर्सी न घालता प्रसिद्ध कृष्णाची जर्सी घातली. तो तसाच मैदानात खेळण्यासाठी उतरला. त्याच्या जर्सीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच क्रिकेटप्रेमींनी ट्रोल केलं.  


वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दीपक हुडाने गोलंदाजी करताना विकेट घेतली आणि फलंदाजी करताना 33 धावा केल्या. वेस्ट इंडिजच्या डावाच्या नवव्या ओव्हरमध्ये धोकादायक फलंदाज काइल मेयरला दीपक हुड्डाने माघारी परतवले. बॉलिंग करताना तो प्रसिद्ध कृष्णाच्या जर्सीमध्ये दिसला. 


यावर सोशल मीडियावर BCCI ला बजेट कमी आहे का असं ट्रोल करण्यात आलं आहे. तर 24 नंबर कृणाल पांड्याचा आहे. त्यामुळे त्याने कृणालची जर्सी घातली असावी असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. दीपक हुड्डाने असं का केलं यामागचं कारण अजून समजू शकलं नाही. सोशल मीडियावर मात्र याची तुफान चर्चा आहे.