किंगस्टन : वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात आज एकमेव टी-२० सामना खेळवला जाणार आहे. वेस्ट इंडिजच्या टी -२० संघात ख्रिस गेल, किरेन पोलार्ड, सुनील नरिने असे स्टार क्रिकेटर असणार आहेत. मात्र त्यानंतरही भारताचे पारडे जड वाटतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्ट इंडिजविरुद्धची वनडे मालिका ३-१ने जिंकल्यानंतर भारताचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलाय. त्यामुळे गेल आणि सहकाऱ्यांविरोधात ते तयारिनीशी उतरतील. 


वेस्ट इंडिजच्या या संघात गेल, मार्लोन सॅम्युअल्स, सुनील नरिने, सॅम्युअल बद्री या सारखे मॅचविनर क्रिकेटर आहेत. तसेच टी-२० संघाचा कर्णधार कार्लोस ब्राथवेट आहे. त्यामुळे  भारताला यांच्याविरोधात वेगळी रणनीती आखणे गरजेचे आहे. 


भारताकडून अजिंक्य रहाणेने वनडे मालिकेत चांगले प्रदर्शन केले होते. त्याने पाच सामन्यांच्या मालिकेत एक शतक आणि तीन अर्धशतके झळकावली. या सामन्यात शिखर धवनसह कर्णधार विराट कोहली सलामीवीराची भूमिका बजावू शकतो. या एकमेव टी -२० सामन्यात युवा क्रिकेटर ऋषभ पंतलाही संधी मिळवण्याची शक्यता आहे. कुलदीप यादवलही संधी मिळू शकते. 


सामन्याची वेळ - रात्री ९ वाजल्यापासून