मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातली तिसरी टी-२० मॅच उद्या मुंबईत खेळवली जाणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगेल. हैदराबादची पहिली टी-२० मॅच जिंकल्यानंतर तिरुवनंतपुरममधल्या दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला होता. आता वानखेडे स्टेडियमवर या सीरिजचा निकाल लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. या मैदानात टीम इंडियाने ३ मॅच खेळल्या यातल्या २ मॅचमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला. २०१७ साली टीम इंडियाने श्रीलंकेला ५ विकेटने पराभूत केलं होतं. २०१२ साली इंग्लंडकडून आणि २०१६ साली वेस्ट इंडिजकडून टीम इंडियाला वानखेडेवर पराभवाचा धक्का लागला होता.


वेस्ट इंडिजच्या टीमने या मैदानात २ मॅच खेळल्या आहेत. या दोन्ही मॅचमध्ये वेस्ट इंडिजचा विजय झाला आहे. २०१६ साली वेस्ट इंडिजने या मैदानात इंग्लंड आणि भारताला हरवलं होतं.


टीम इंडियाचे बहुतेक बॅट्समन हे फॉर्ममध्ये आहेत, पण बॉलरची खराब कामगिरी विराट कोहलीची चिंता वाढवू शकते. या मॅचमध्ये मोहम्मद शमीला संधी दिली जाऊ शकते. शमीचं टीममध्ये पुनरागमन झालं, तर भुवनेश्वर कुमार किंवा दीपक चहरला टीमबाहेर बसावं लागू शकतं.


भारतीय टीम


विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, संजू सॅमसन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार


वेस्ट इंडिज


कायरन पोलार्ड (कर्णधार), फॅबियन एलन, शेल्डन कॉट्रेल, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, कीमो पॉल, ब्रॅण्डन किंग, एव्हिन लुईस, खैरी पियरे, निकोलस पूरन, दिनेश रामदिन, शेरफेन रदरफोर्ड, लेंडल सिमन्स, केसरिक विलियम्स, हेडन वॉल्श ज्युनियर