मुंबई-पुण्यात भारत-वेस्ट इंडिजच्या दोन मॅच
इंग्लंडविरुद्धची टेस्ट सीरिज संपल्यानंतर भारत आशिया कप खेळणार आहे.
मुंबई : इंग्लंडविरुद्धची टेस्ट सीरिज संपल्यानंतर भारत आशिया कप खेळणार आहे. आशिया कपनंतर वेस्ट इंडिजची टीम भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. वेस्ट इंडिजच्या या दौऱ्यामध्ये २ टेस्ट, ५ वनडे आणि ३ टी-२०चा समावेश आहे. वेस्ट इंडिजच्या या दौऱ्यामध्ये २ वनडे मुंबई आणि पुण्यात आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धची तिसरी वनडे २७ ऑक्टोबरला मुंबईत आणि चौथी वनडे २९ ऑक्टोबरला पुण्यात होणार आहे.
४ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबरपर्यंत वेस्ट इंडिजचा हा दौरा चालेल. ११ सप्टेंबरला भारताचा इंग्लंड दौरा संपणार आहे. त्यानंतर भारत आशिया कपसाठी युएईला जाईल. १५ सप्टेंबरपासून आशिया कपला सुरुवात होत आहे. पण भारताचा पहिला सामना १८ सप्टेंबरला आहे. भारत आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचला तर २८ सप्टेंबरला मॅच खेळायला लागेल. म्हणजेच आशिया कप ते वेस्ट इंडिजविरुद्धची पहिली टेस्ट यामध्ये भारतीय टीमला सरावाला फक्त ५ दिवस मिळणार आहेत.
टेस्ट सीरिजचं वेळापत्रक
पहिली टेस्ट : ४-८ ऑक्टोबर- राजकोट
दुसरी टेस्ट- १२-१६ ऑक्टोबर- हैदराबाद
वनडे सीरिजचं वेळापत्रक
पहिली वनडे- २१ ऑक्टोबर- गुवाहाटी
दुसरी वनडे- २४ ऑक्टोबर- इंदूर
तिसरी वनडे- २७ ऑक्टोबर- पुणे
चौथी वनडे- २९ ऑक्टोबर- मुंबई
पाचवी वनडे- १ नोव्हेंबर- तिरुअनंतपुरम
टी-२० सीरिजचं वेळापत्रक
पहिली टी-२०- ४ नोव्हेंबर- कोलकाता
दुसरी टी-२०- ६ नोव्हेंबर- कानपूर किंवा लखनऊ
तिसरी टी-२०- ११ नोव्हेंबर- चेन्नई