मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना कोलकात्याच्या मैदानावर खेळवला गेला. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघाने धमाकेदार सुरुवात केली आहे. निकोलस पूरनच्या 61 धावांच्या जोरावर वेस्ट इंडिजने 157 धावा केल्या. (India win First T20 match by 6 wickets)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताकडून रोहित शर्माने 19 बॉलमध्ये 40, इशान किशनने 42 बॉलमधये 35, विराट कोहलीने 13 बॉलमध्ये 17 तर ऋषभ पंतने 8 रन केले. सुर्य़कुमार यादवने 18 बॉलमध्ये 34 आणि वेंकटेश अय्यरने 13 बॉलमध्ये 24 रनची शानदार खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. 


भारताला 158 धावांचे लक्ष्य


प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिज संघाने भारतीय संघाला 158 धावांचे लक्ष्य दिले होते. वेस्ट इंडिज संघाची सुरुवात खूपच खराब झाली. सलामीवीर ब्रेंडन किंग चार धावा करून भुवनेश्वर कुमारचा बळी ठरला. विंडीजसाठी यष्टिरक्षक फलंदाज निकोलस पूरनने सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने 43 चेंडूत 5 षटकारांसह 61 धावा केल्या. काईलने 31, रोस्टन चेसने 4 धावा, रोमन पॉवेल 2 धावा आणि अकील हुसेनने 10 धावांचे योगदान दिले. किरॉन पोलार्डने शेवटी फटाक्यांची आतषबाजी खेळली. त्याच्यामुळेच वेस्ट इंडिज भारतीय संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेऊ शकला. किरॉन पोलार्डने 19 चेंडूत 24 धावा केल्या.


भारतीय गोलंदाजांची कमाल


सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिज संघाला धक्के देण्यास सुरुवात केली. भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकात ब्रेंडन किंगला 4 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याचबरोबर युझवेंद्र चहलनेही उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना सादर केला आहे. त्याला चार षटकात 34 धावा देऊन एक विकेट मिळाली आहे. या सामन्यात पदार्पण करणाऱ्या रवी बिश्नोईने एकाच षटकात दोन बळी घेत वेस्ट इंडिज संघाचे कंबरडे मोडले. रवीने चार षटकांत 17 धावा देत दोन बळी घेतले. व्यंकटेश अय्यरने एक ओव्हर टाकली पण त्याला एकही विकेट मिळाली नाही. भुवनेश्वर कुमारने चार षटकात 31 धावा देत 1 बळी घेतला. त्याचवेळी हर्षल पटेल महागडा ठरला, त्याने 4 षटकात 37 धावा देत 2 बळी घेतले.