India VS England भारताचा 66 धावांनी इंग्लंडवर विजय
टेस्ट आणि टी २० सिरिजनंतर हा भारत इंग्लंडचा पहिला सामना होता, यात भारता
पुणे : टेस्ट आणि टी २० सिरिजनंतर हा भारत इंग्लंडचा पहिला सामना होता, यात भारताने विजय मिळवला आहे. भारताने इंग्लंडला 3 सामन्यांच्या मालिकेत पहिल्या सामन्यात 66 धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना भारताला इंग्लंडसमोर 318 धावांचे लक्ष्य होते, त्यास उत्तर म्हणून इंग्लंड 251 धावा केल्या, अखेर भारताचा ६६ धावांनी विजय झाला.
भारताकडून कृष्णाने सर्वाधिक विकेट घेतल्या. या व्यतिरिक्त शार्दुल ठाकूरने 3 आणि भुवनेश्वर कुमारने 2 गडी बाद केले. भारताच्या फलंदाजीचा विचार केला तर शिखर धवनने 98 धावा केल्या.
संपूर्ण इंग्लंडचा संघ 251 धावांवर बाद झाला. कृष्णाने 43 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर टॉम क्रेनची विकेट घेतली. टॉमचा कॅच भुवनेश्वर कुमारने घेतला. एकदिवसीय मालिकेत भारताने १-० ने आघाडी घेतली आहे.