कोलंबो : कसोटी मालिकेनंतर भारताने वनडे मालिकेतही श्रीलंकेला व्हाईटवॉश दिलाय. वनडे मालिकेत भारताने श्रीलंकेविरुद्ध ५-० असे निर्भेळ यश मिळवलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्णधार कोहलीचे दमदर शतक आणि केदार जाधवचे अर्धशतकाच्या जोरावर भारताने विजयासाठीचे २३९ धावांचे आव्हान सहा विकेट राखून पूर्ण केले. 


पहिले दोन्ही सलामीवीर झटपट बाद झाल्यानंतर कोहलीने किल्ला लढवताना भारताला शानदार विजय मिळवून दिला. कोहलीने ११६ चेंडूत ११० धावा केल्या. त्याचे वनडेतील हे ३०वे शतक ठरले.


केदार जाधवनेही विराटला चांगली साथ दिली. त्याने ७३ चेंडूत ६३ धावा केल्या. यामुळे भारताने ४ गड्यांच्या मोबदल्यात २३९ धावा केल्या आणि मालिकेत निर्भेळ यश मिळवले. 


तत्पूर्वी, श्रीलंकेने नाणेफेक जिंकताना प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा डाव २३८ धावांवर संपुष्टात आला.