दम्बुला : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने नऊ विकेट राखत शानदार विजय मिळवलाय. श्रीलंकेने विजयासाठी ठेवलेले २१७ धावांचे आव्हान भारताने एका गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने २८.५ षटकांत एक बाद २२० धावा करताना सफाईदार विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतलीये. 


शिखर धवनचे नाबाद शतक आणि कर्णधार विराट कोहलीचे अर्धशतकाच्या जोरावर भारताने हा विजय सहज मिळवला. धवनने ९० चेंडूत १३२ धावा तडकावल्या. तर विराटने ७० धावांत ८२ धावा ठोकल्या.


तत्पूर्वी, श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना २१६ धावा केल्या होत्या.  श्रीलंकेचा सलामीन निरोशन डिकेवालाने सर्वाधिक ६४ धावांची खेळी केली. तर कुशल मेंडिसने ३६ धावा केल्या. दनुष्का गुंथिलकाने ३५ धावा केल्या. श्रीलंकेचे इतर फलंदाज मात्र सपशेल अपयशी ठरले.