हॅमिल्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या रोमांचक मॅचमध्ये भारताचा सुपर ओव्हरमध्ये विजय झाला आहे. सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या २ बॉलवर १० रनची गरज असताना रोहित शर्माने टीम साऊदीच्या दोन्ही बॉलला सिक्स मारून भारताला मॅच जिंकवून दिली. सुपर ओव्हरमध्ये भारताला विजयासाठी १७ रनची गरज होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॅच टाय झाल्यानंतर न्यूझीलंडकडून केन विलियमसन आणि मार्टिन गप्टील बॅटिंगला आले. या दोघांनी बुमराहच्या बॉलिंगला १७ रन काढले. नेहमी किफायती बॉलिंग करणाऱ्या बुमराहने या मॅचमध्ये मात्र खोऱ्याने रन दिले. बुमराहने त्याच्या ४ ओव्हरमध्ये सर्वाधिक ४५ रन देऊन एकही विकेट घेतली नाही.


भारताने ठेवलेल्या १८० रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने २० ओव्हरमध्ये १७९/६ एवढा स्कोअर केला. कर्णधार केन विलियमसनने ४८ बॉलमध्ये ९५ रनची खेळी केली. भारताकडून शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या. तर युझवेंद्र चहल आणि रवींद्र जडेजाला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.


न्यूझीलंडने या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि केएल राहुलने भारताला ८.६ ओव्हरमध्ये ८९ रनची ओपनिंग पार्टनरशीप करुन दिली. राहुल आणि रोहितच्या पार्टनरशीपनंतर मात्र भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. रोहित शर्मा ४० बॉलमध्ये ६५ रन करुन आऊट झाला. तर राहुलला १९ बॉलमध्ये २७ रन करता आले. विराट कोहलीने २७ बॉलमध्ये ३८ रन केले.


न्यूझीलंडकडून हमीश बेनेटने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. मिचेल सॅन्टनर आणि कॉलिन डिग्रॅण्डहोमला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. या विजयासोबतच भारताने ५ टी-२० मॅचच्या सीरिजमध्ये ३-०ने विजयी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडच्या मैदानात भारताने पहिल्यांदाच टी-२० सीरिज जिंकण्याचा विक्रम केला आहे.