कोलंबो : बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मध्ये भारतानं १७ रन्सनं शानादार विजय मिळवला आहे. १७७ रन्सच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशनं २० ओव्हरमध्ये १५९/६ एवढा स्कोअर केला. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरनं सर्वाधिक ३ विकेट घेतल्या तर मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि युझवेंद्र चहलला प्रत्येकी एक विकेट मिळाली. या विजयाबरोबरच ट्राय सीरिजच्या फायनलमध्येही भारतानं प्रवेश केला आहे.


त्याआधी भारतानं २० ओव्हरमध्ये ३ विकेट गमावून १७६ रन्स केल्या. या मॅचमध्ये बांगलादेशनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. पण ओपनिंगला आलेल्या रोहित शर्मा आणि शिखर धवननं भारताला चांगली सुरुवात करुन दिली. फॉर्मसाठी झगडणाऱ्या रोहित शर्माला अखेर या मॅचमध्ये सूर गवसला. रोहित शर्मानं ६१ बॉल्समध्ये ८९ रन्सची खेळी केली. तर सुरेश रैनानं ३० बॉल्समध्ये ४७ रन्स केले. शिखर धवन २७ बॉल्समध्ये ३५ रन्स करुन आऊट झाला. बांगलादेशकडून रुबेल हुसेनला २ विकेट मिळाल्या, तर रोहित शर्मालाही रुबेलनंच रन आऊट केलं.