Surbhi Jyoti on Naseem Shah : आशिया कपमध्ये पाकिस्तानचा खेळाडू नसीम शाहने आपल्या कामगिरीने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं नाव मोठं केलं आहे. आशिया कपमधील दोन सामन्यांमध्ये त्याने केलेल्या गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावर आपली छाप उमटवली. जगभरातील क्रिकेटप्रेमी नसीम शहाचे चाहते बनले आहेत. अशातच एका भारतीय अभिनेत्रीनेही उघडपणे नसीम शहाचं कौतुक केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानला नक्कीच एक हिरा मिळाला आहे, असं सुरभी ज्योतीने म्हटलं आहे. सुरभीने केलेलं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पाकिस्तानी मीडियामध्ये अभिनेत्रीच्या ट्विटच्या चर्चा रंगल्या आहेत. नसीमने भारताविरूद्धही भेदक गोलंदाजी करत बॅकफूटला ढकललं होतं. त्यानंतर अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यामध्ये तर नसीम हिरो ठरला होता.


पाकिस्तानला शेवटच्या ओव्हरमध्ये 11 धावांची गरज होती आणि पाकिस्तानकडे फक्त 1 विकेट शिल्लक होती. नसीमने सलग दोन षटकार मारत पाकिस्तानला सामना जिंकून दिला होता. नसीमच्या विजयी खेळीने पाकिस्तानने आशिया कपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. येत्या टी-20 विश्वचषकासाठीही नसीमची जोरदार चर्चा आहे. शाहिन आफ्रिदीच्या अनुपस्थितीत नसीमने केलेल्या बॉलिंगने त्याची कमी जाणवून दिली नाही.


 



कोण आहे सुरभी ज्योती- 
टीव्ही मालिका ‘नागिन’ मध्ये काम केले आहे. सुरभी ज्योतीला सर्वाधिक प्रसिद्धी ‘कबूल है’ या मालिकेतून मिळाली होती. या मालिकेतील भूमिकेसाठी तिला इंडियन टेली अवॉर्ड्सनं सन्मानित केलं गेलं होतं.