Mohammad Siraj ICC Ranking: भारतीय संघाचा जलद गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आयसीसी (International Cricket Council) क्रमवारीत पहिल्या स्थानी पोहोचला आहे. न्यूझीलंडविरोधातील (New Zeland) एकदिवसीय मालिकेत सिराजने जबरदस्त कामगिरी केली असून, याचा त्याला चांगलाच फायदा झाला आहे. आयसीसी क्रमवारीत मोहम्मद सिराजने अव्वल क्रमांक पटकावला आहे. यानिमित्ताने मोहम्मद सिराजच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

28 वर्षीय मोहम्मद सिराज आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. सिराजने न्यूझीलंडचा जलद गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि ऑस्ट्रेलिया गोलंदाज जोश हेजलवूड यांना मागे टाकलं आहे. सिराजने 729 गुणांसहित पहिला क्रमांक पटकावला आहे. तर हेजलवूड 727 गुणांसहित दुसऱ्या क्रमांकावर आहे. 


पदार्पणाच्या तीन वर्षांनी खेळला दुसरा एकदिवसीय सामना


मोहम्मद सिराजने 15 जानेवारी 2019 रोजी ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्यातून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. या सामन्यात मोहम्मद सिराजला एकही विकेट मिळाली नव्हती. विशेष म्हणजे या सामन्यानंतर पुढील तीन वर्षं त्याला संधी मिळाली नव्हती. सहा वर्षांनी 2022 मध्ये त्याने आपल्या करिअरमधील दुसरा एकदिवसीय सामना खेळला होता. 


यानंतर मात्र सिराजने जबरदस्त प्रदर्शन केलं. सिराजने आतापर्यंत भारतीय संघासाठी 21 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 20.73 च्या सरासरीने 38 विकेट्स घेतल्या आहेत. नुकतंच सिराजने न्यूझीलंडविरोधातील तीनपैकी दोन सामने खेळले. या दोन सामन्यात त्याने पाच विकेट्स घेतले. याआधी श्रीलंकेविरोधातील तीन एकदिवसीय सामन्यात त्याने नऊ विकेट्स घेत तुफान कामगिरी केली होती.   



फलंदाजांमध्ये शुबमन गिल आणि रोहितला फायदा


फलंदाजांच्या क्रमवारीत शुभमन गिल आणि भारतीय कर्णधार रोहित शर्मा यांना फायदा झाला असून दोन क्रमांकांनी पुढे गेले आहेत. न्यूझीलंडविरोधात द्विशतक ठोकणारा गिल सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर रोहित शर्मा नवव्या स्थानावर आहे. या दोघांव्यक्तिरिक्त विराट कोहलीने टॉप 10 मध्ये स्थान मिळवलं आहे. विराट कोहलीचं स्थान घसरलं असून सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे.