नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट टीमने वर्ल्डकप जिंकला आणि या सर्वच महिला खेळाडूंकडे सर्वांच्या नजरा लागल्या. खासकरून महिला क्रिकेट टीमची कर्णधार मिथाली राज हिची सर्वात जास्त चर्चा रंगली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्डकप फायनलआधी एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला मिथाली राजने सडेतोड उत्तर देत त्याचं तोंड बंद केलं होतं. आता एका ट्विटर यूजरच्या एका कमेंटवर तिने तसंच तडेतोड उत्तर दिलं आहे. 




मिथाली राजने नुकताच सहकारी खेळाडू वेदा कृष्णमूर्ती, ममता माबेन आणि नूशीन अल खादीरसोबतचा ट्विटरवर एक फोटो शेअर केला. या फोटोत मितालीच्या काखेत घाम आल्याचे दिसत आहे. यावर एका ट्विटर यूजरने आक्षेपार्ह कमेंट केली. यावर मिथाली राजने तितक्याच सडेतोड शब्दात त्याला उत्तर दिले आहे. 



मिथालीने उत्तर त्याला दिले की, ‘मी आज जिथे आहे त्याचं कारण मी मैदानात घाम गाळते. यात लाजिरवाणं वाटण्याचं कोणतही कारण मला दिसत नाही. आणि मी एका क्रिकेट अकॅडमीच्या उद्घाटन सोहळ्यात एका मैदानात आहे’.


मिथालीसोबतच मिथालीच्या फॅन्सने सुद्धा त्या ट्विटर यूजरला खरेखोटे सुनावले.