टीम इंडिया आणखी एक मालिका खेळणार पण रोहित शर्मा कॅप्टन नसणार
IPL 2022 नंतर टीम इंडिया आणखी एक मालिका खेळणार, पण रोहित शर्मा कॅप्टन नसणार
मुंबई : टीम इंडियाच्या खेळाडूंचं बिझी शेड्युल असणरा आहे. श्रीलंकेविरुद्ध कसोटी सीरिजनंतर IPL 2022 त्यानंतर पुन्हा परदेश दौऱ्याचं शेड्युल असणार आहे. IPL 2022 नंतरच्या परदेश दौऱ्यात मात्र रोहित शर्मा कॅप्टन नसणार अशी माहिती समोर आली आहे.
जून महिन्यात आयर्लंड विरुद्ध भारत टी 20 सीरिज होणार आहे. 26 आणि 28 जून रोजी टी 20 सीरिज खेळवण्यात येईल. ही सीरिज मालाहाइड इथे खेळवण्यात येणार आहे. या सीरिजसाठी मात्र अनेक दिग्गज क्रिकेटर मैदानात उतरणार नाहीत अशी माहिती मिळाली आहे.
या सीरिजमध्ये अनेक नव्या खेळाडूंना संधी दिली जाणार आहे. याच दौऱ्याच्या जवळपास इंग्लंड विरुद्ध भारत सामना होणार आहे. 1 ते 5 जुलै भारत विरुद्ध इंग्लंड सीरिज खेळवण्यात येणार आहे. 2021 मधील कसोटी सामना खेळायचा बाकी होती तो सामना खेळवण्यात येणार आहे.
आयर्लंड विरुद्ध होणाऱ्या टी 20 सामन्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रिषभ पंतसारखे दिग्गज खेळाडू या सीरिजमध्ये खेळणार नाहीत. यासंदर्भात आयर्लंडने ट्वीट करून माहिती दिली आहे.
न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि टीम इंडिया आयर्लंडमध्ये येणार आहे. क्रिकेटच्या स्पर्धाचा हा मेळाच असणार आहे. सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यासाठी आम्ही सज्ज आहोत. टीम इंडियासोबत टी 20 सीरिजपासून या स्पर्धेची सुरुवात होणार आहे. या सीरिजमुळे आयर्लंडला मोठा फायदा होणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
2021 मधील टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड उर्वरित दौरा जुलैमध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू त्या तयारीमध्ये असणार आहेत. इंग्लंडमध्ये 3 टी 20 आणि 3 वन डे सामन्यांचंही आयोजन करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
टीम इंडियाने 2018 मध्ये आयर्लंड दौरा केला होता. त्यानंतर कोरोनामुळे कोणताही दौरा झाला नाही. आता पुन्हा एकदा नव्या खेळाडूंसंह टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यावेळी रोहित ऐवजी कोणाच्या खांद्यावर कर्णधारपदाची कमान असणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.