भारतीय क्रिकेटर अडकणार विवाहबंधनात, IPL दरम्यान मैदानावर केलं होतं प्रपोज
आग्रा येथील फतेहाबाद रोडवर असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये दोघे सात फेरे घेणार आहेत.
मुंबई : आयपीएलचा सीजन संपला आहे. सगळेच खेळाडू आता आपल्या घरी परतले आहेत. प्रत्येक जण आपल्या खाजगी कामात व्यस्त झाला आहे. त्यातच भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज दीपक चहर बुधवारी जया भारद्वाजसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. दीपकची होणारी पत्नी जया कुटुंबासह ताजनगरीत दाखल झाली आहे.
आग्रा येथील फतेहाबाद रोडवर असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये दोघे सात फेरे घेणार आहेत. मंगळवारी सायंकाळपासून लग्नाच्या विधींना सुरुवात होणार आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून मेहंदी सोहळा आहे. मेहंदी सोहळ्यानंतर रात्री संगीत होईल, त्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. मेहंदी सोहळ्यापूर्वी दीपक आणि जया यांचे फोटो समोर आले आहेत.
दीपकचे वडील आणि बहीण मालती चहर देखील फोटोंमध्ये दिसत आहेत. क्रिकेटर दीपक चहर म्हणतो की, मी कुटुंब आणि प्रियजनांसोबतचे हे क्षण संस्मरणीय बनवत आहे. लग्नात जयासोबत डान्स करण्याच्या नवीन स्टेप्स शिकल्या. दीपक सांगतो की, मी सध्या एका वेगळ्याच अनुभवातून जात आहे. याला प्रेम म्हणावं, काय म्हणावं... मला माहीत नाही.
दीपकची भावी वधू जया भारद्वाज मूळची बाराखंबा, दिल्लीची आहे. ती दिल्लीतील एका टेलिकॉम कंपनीत डिजिटल कंटेंट हेड म्हणून काम करत आहेत. दीपक चहरने आयपीएलच्या एका लीग सामन्यादरम्यान जया भारद्वाज हिला प्रपोज केले होते. ज्याची खूपच चर्चा रंगली होती.
दीपकच्या लग्नात पाहुण्यांसाठी वेगवेगळे पदार्थ असतील. त्यात थाई आणि इटालियन खाद्यपदार्थांसह ब्रज, अवधी, मुगलाई, पंजाबी, दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ असतील. आग्राचा प्रसिद्ध चाट स्टॉलही असेल. त्यात गोलगप्पा, दहीभल्ला, चाट पापडी, कुल्फी, पावभाजीही असेल. मिठाई म्हणून हातरसची प्रसिद्ध रबडी असेल.
दीपक चहरच्या लग्नसोहळ्याला अनेक बडे क्रिकेटर्स उपस्थित राहण्याची शक्यता आहे.