Dinesh Karthik: Valentine Day साजरा करण्यासाठी मदत मागणाऱ्या चाहत्याला दिनेश कार्तिकचं भन्नाट उत्तर
Dinesh Karthik: भारतीय क्रिकेटर दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) ट्विटरला (Twitter) आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. दरम्यान यावेळी एका चाहत्याने त्याला Valentine`s Day साजरा करण्यास मदत मागितली. यावर त्याने भन्नाट उत्तर दिलं.
Dinesh Karthik: व्हँलेटाइन वीक (Valentine's Day Week) सुरु झाला असून सध्या संपूर्ण देशात प्रेमी युगूल सेलिब्रेशन करत आहेत. आपल्या आवडत्या व्यक्तीला भेटवस्तू देण्यापासून ते तो साजरा कसा करावा यासाठी नवनव्या योजना आखल्या जात आहेत. यासाठी मग आपल्या मित्रांपासून ते इंटरनेटपर्यंत अनेक गोष्टींची मदत घेतली जात आहे. भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) ट्वीटरला प्रश्नोत्तरं सेशन केलं असता, तिथेही त्याला Valentine's Day संबंधी प्रश्न विचारण्यात आले. जेव्ह एका चाहत्याने आपल्या प्रिय व्यक्तीसह Valentine's Day साजरा कऱण्यासाठी मदत मागितली तेव्हा दिनेश कार्तिकने त्याला भन्नाट उत्तर दिलं.
भारतीय संघात स्थान मिळू न शकलेला दिनेश कार्तिक सध्या कॉमेंट्रीमध्ये व्यग्र आहे. दिनेश कार्तिक भारतीय क्रिकेट संघाच्या कामगिरीचा आढावा घेत आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेतही दिनेश कार्तिक समालोचन करताना दिसणार आहे. दरम्यान मोकळ्या वेळेत कार्तिकने ट्विटरला AskDK session आयोजित केलं होतं. यावेळी एका चाहत्याने दिनेश कार्तिकला मला Valentine's Day साजरा करण्यास मदत कर असं म्हटलं. (Sir help me in celebrating valentine's day with someone this year)
यावर उत्तर देताना कार्तिकने एक फोटो शेअर केला. या फोटोत एक व्यक्ती आरशामध्ये स्वत:चं प्रतिबिंब पाहत असल्याचं दिसत आहे.
या सेशनदरम्यान, कार्तिकने Border-Gavaskar मालिकेत आपण समालोचन करणार असल्याचं सांगितलं आहे.
"ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण करताना तुम्हाला कसे वाटते, याबद्दल तुमच्या भावना काय आहेत? समालोचक होण्यासाठी क्रिकेटपटू असणे महत्त्वाचे आहे का? कारण बहुतेक समालोचक निवृत्त क्रिकेटर आहेत," असं एका चाहत्याने विचारलं. यावर कार्तिकने आपला समालोचन करतानाचा फोटो शेअर करत उत्तर दिलं.
इंग्लंडविरोधात 2021 मध्ये झालेल्या मालिकेत कार्तिकने समालोचन केलं होतं. अद्यापही क्रिकेटमध्ये सक्रीय असतानाही ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेत तो पुन्हा एकदा ही भूमिका साकारणार आहे.