मुंबई : भारतीय क्रिकेट संघाची धुरा सांभाळून एकेकाळी संघाला यशाच्या परमोच्च शिखरावर नेऊन ठेवणाऱ्या महेंद्रसिंह धोनी याच्याविषयी चाहत्यांना, क्रीडारसिकांना कायमच कुतूहल असतं. अर्थात सोशल मीडियाच्या माध्यमातून माही अनेकदा त्याच्या असंख्य चाहत्यांच्या संपर्कात येतोही. पण, इतर खेळाडूंच्या तुलनेत मात्र तो सोशल मीडियावर फार कमीच रमतो. अर्थात त्याची ही कसर भरुन काढते, पत्नी साक्षी. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माही सोशल मीडियावर जितका कमी रमतो, तितकीच साक्षी या माध्यमावर कमालीची सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. व्हिडिओ म्हणू नका किंवा मग फोटो, कुटुंबाचे काही खास क्षण ती कायमच सर्वांच्या भेटीला आणते. सध्या मात्र तिने शेअर केलेला एक फोटो पाहून अनेकांना धक्काच बसत आहे. किंबहुना तिचा हा फोटो बराच व्हायरलही होत आहे. 


माहीसोबतचा एक फोटो साक्षीने शेअर केला आहे. या फोटोमध्ये धोनी मोबाईलमध्ये काहीतरी पाहण्यात मग्न असल्याचं दिसत आहे. त्याचं लक्ष वेधण्यासाठी म्हणून साक्षी चक्क त्याच्या पायाचा अंगठा चावायचा प्रयत्न करताना दिसत आहे. तिचा हा फोटो आणि या दोघांचीही केमिस्ट्री पाहता पत्नीसोबतचा माहिचा हा अंदाज सर्वांचीच मनं जिंकत आहे.



 


गेल्या काही काळापासून कोरोना व्हायरसने मोठ्या प्रमाणावर संपूर्ण जगासह भारतातही धुमाकूळ घातल्यामुळे आता बहुतांश खेळाडू त्यांच्या कुटुंबासमवेत हा लॉकडाऊनचा काळ व्यतीत करत आहेत. मुख्य म्हणजे आयपीएल स्पर्धाही अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्यामुळे आता मुख्य भारतीय संघात माहीच्या परतीच्या वाटांविषयीच प्रश्न उभा राहत आहे. या स्पर्धेतील त्याच्या प्रदर्शनावरच संघातील स्थान अवलंबून असल्याचं चित्र होतं. पण, आता मात्र परिस्थितीत बदलल्यामुळे क्रीडारसिकांना कुतूहल आहे ते म्हणजे माहीच्या कारकिर्दीचं.