Mohammed Shami On Jai Shri Ram : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) मागील वर्ल्ड कप सामन्यांमध्ये चांगलाच चमकला. 2015 आणि 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये देखील शमीने अफलातून कामगिरी केली करत विरोधी संघाच्या नांग्या ठेचल्या होत्या. मात्र, धर्माच्या नावावर त्याला अनेकदा ट्रोल केल्याचं दिसून आलं. वर्ल्ड कपपूर्वी झालेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये प्रेक्षकांनी शमीला पाहताच जय श्रीरामचा (Jai Shri Ram) नारा लगावला. त्यावर अनेकांनी संताप देखील व्यक्त केला होता. मात्र, असं असताना देखील शमीने सर्वांची मनं जिंकली आहेत. नुकत्याच शमीने दिलेल्या एका मुलाखतीत शमी असं काही म्हणाला की, अनेकांनी त्याचं तोंडभरून कौतूक केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाला मोहम्मद शमी?


प्रत्येक धर्मात असे काही ना काही लोक असतात, ज्यांना समोरची माणसं आवडत नाही (समोरच्या धर्माच्या लोकांना...) मला कोणत्याही गोष्टीची अडचण नाही. जर आज मंदिर उभं राहत असेल तर काहीही दुखणं नसावं. जय श्रीराम म्हणायला काय हरकत आहे? हजार वेळा बोला ना...! तुम्हाला जर हजार वेळा बोलायचं असेल तर खुशाल बोला. जर मला हजार वेळा अल्लाहू अकबर म्हणायचं असेल तर मी हजार वेळा म्हणेल.. काय फरक पडतो. यामुळे कोणाला काहीही फरक पडू नये, असं मोहम्मद शमी याने म्हटलं आहे.


मोहम्मद शमीच्या या वक्तव्यावर अनेकांनी त्याचं कौतूक केलं आहे. शमीच्या बेधडक वक्तव्यामुळे त्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते. मोहम्मद शमीने अनेकदा धार्मिक मुद्द्यांवर आपली बाजू बेधडकपणे मांडली आहे. मोहम्मद शमीला नुकताच त्याच्या वर्ल्ड कपमधील अफलातून कामगिरीबद्दल अर्जून अवॉर्ड मिळाला आहे. सर्वाधिक 24 विकेट्स घेत त्याने टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचवलं होतं.



...तर मी निवृत्ती घेईल!


दरम्यान, ज्या दिवशी मला क्रिकेटचा कंटाळा येईल, तेव्हा मी क्रिकेट खेळणं बंद करेन. मला आयुष्यात कशाचाही भार वाहायचा नाही आणि मला कुणीही समजावणार नाही. तसेच माझ्या कुटुंबातील कोणीही मला याबद्दल सांगणार नाही. ज्या दिवशी मला जाग येईल आणि लक्षात येईल, अरे यार! मला मैदानात नाही जायचं, त्याच दिवशी मी ट्विटरवर पोस्ट करत माझ्या निवृत्तीची घोषणा करणार आहे, असंही मोहम्मद शमीने म्हटलं आहे.