प्रसिद्ध क्रिकेटरच्या बायकोचा बेडरूममधील व्हिडीओ व्हायरल, नेटीझन्सकडून मॉडल ट्रोल
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली.
मुंबई : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्या वैवाहिक जीवनातील वाद सर्वांना माहित आहे. हसीन जहाँने शमीवर मोठे आरोप केले आहेत. त्यानंतर दोघांच्याही घटस्फोटाच्या बातम्यासमोर आल्या आहेत. परंतु त्या दोघांनी घटस्फोट न घेताच एकमेकांपासून वेगळे राहू लागले आहेत. मोहम्मद शमी याची बायको हसीन जहाँ ही एक मॉडल आहे आणि ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर अनेक लोकं तिला पसंत करतात, तर काही लोकं तिला ट्रोल्स देखील करतात.
यावेळीही असेच काहीसे घडले आहे. हसीन जहाँने नुकताच आपला एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ तिच्या बेडरुममधील आहे. ज्यामध्ये ती बेडवर झोपली आहे. जे पाहिल्यानंतर लोकांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली.
हसीन जहाँने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती पंजाबी गायक बादशाहच्या 'हाय समर' गाण्यावर डोलत आहे आणि लिपसिंक करुन गाणं गात आहे. परंतु लोकांना हसीन जहाँचा हा अंदाज आवडला नाही. जे पाहून लोकं तिला विचित्र कमेंट्स करु लागले आहेत.
एका युजरने ट्रोल करताना हसीन म्हटलं की, तुझ्या अशा वागण्यामुळेच तू आता सिंगल आहेस. तर दुसऱ्या युजरने शमी भैया बेपत्ता असल्याचे म्हटले आहे. हसीन जहाँला सोशल मीडियावर ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. ती यापूर्वी बऱ्याचदा ती ट्रोल झाली आहे.
2018 मध्ये, मोहम्मद शमीवर त्याची पत्नी हसीन जहाँने प्राणघातक हल्ला, बलात्कार, हत्येचा प्रयत्न आणि घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. हसीन जहाँने शमी आणि त्याच्या भावावर गुन्हा दाखल केला होता. शमीविरुद्ध कलम ४९८ए (हुंडा छळ) आणि कलम ३५४ (लैंगिक छळ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, तर त्याचा भाऊ हसिद अहमद याच्यावर कलम ३५४ (लैंगिक छळ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मोहम्मद शमीने 6 जून 2014 रोजी कोलकाता मॉडेल हसीन जहाँशी लग्न केले होते. हसीन एक मॉडेल होती. त्यानंतर ती कोलकाता नाईट रायडर्सची चीअर लीडर बनली. यादरम्यान दोघांची भेट झाली आणि दोघांचंही एकमेकांवरती प्रेम जडलं. त्यानंतर शमीने घरच्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन लग्न केले. 17 जुलै 2015 रोजी शमी एका मुलीचा पिताही झाला.