हा इंडियन खेळाडू, आपल्या सह खेळाडूच्या पत्नीसोबत अडकला विवाह बंधनात
या गोष्टीला खूप वर्षे उलटली आहेत. परंतु तुम्हाला माहित आहे का? की इंडियन टीम मधल्या एका खेळाडूने त्याच्या मित्राच्या पत्नी सोबत लग्न केलं आहे.
मुंबई : सध्या टीम इंडियामध्ये लग्नाचे वारे वाहात आहे. आशातच एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. बॅालीवूडमध्ये तशी ही गोष्ट नवीन नाही, परंतु इंडियन क्रिकेट टीममध्ये पहिल्यांदाच ऎकायला मिळत आहे. तसे पहाता या गोष्टीला खूप वर्षे उलटली आहेत. परंतु तुम्हाला माहित आहे का? की इंडियन टीम मधल्या एका खेळाडूने त्याच्या मित्राच्या पत्नी सोबत लग्न केलं आहे.
हो हे खरं आहे. दिनेश कार्तिकच्या (Dinesh Karthik) पत्नीने एकेकाळी टीम इंडियाचा स्टार बॅट्समन असलेल्या मुरली विजय (Murali Vijay) सोबत लग्न केलं आहे. ज्या वेळेस त्या दोघांनी लग्न केलं त्या वेळेत कार्ति ची पत्नी प्रेग्नेन्ट होती. परंतु नंतर कार्तिकने आपल्या मुला वरती हक्क दाखवला नाही.
दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) 2007 मध्ये त्याच्या लहानपणीची मैत्रीण निकिता सोबत लग्न केलं होतं. त्यानंतर 2012 साली दिनेश कार्तिकच्या पत्नीची ओळख क्रिकेटर मुरली विजयसोबत (Murali Vijay) झाली. त्यानंतर त्या दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरवात केली. दिनेश कार्तिकला जेव्हा ही गोष्ट समजली, तेव्हा त्याने लगेचच निकिताला सोड चिठ्ठी (Divorce) दिली.
आता दिनेश कार्तिकची पत्नी कोण?
पत्नीला सोडल्यानंतर कार्तिकला (Dinesh Karthik)खूप वाईट परिस्थितीला सामोरे जाव लागले. आशा वेळी त्याला साथ दिली ती दीपिका पल्लीकलने (Dipika Pallikal ) . दीपिकाने कार्तिकला खूप सपोर्ट केला आणि त्याला धीर दिला.
दीपिका पल्लीकल (Dipika Pallikal ) ही एक भारतीय व्यावसायिक स्क्वॅश खेळाडू आहे. पीएसए महिला क्रमवारीत पहिल्या दहामध्ये स्थान मिळवणारी ती पहिली भारतीय आहे.
2014मध्ये एका इव्हेंटमध्ये दोघांनी सांगितले की, ते दोघं कदाचित 2015 मध्ये लग्नाच्या बंधनात अडकतील आणि ते खरोखरचं 2015 मध्ये लग्न बंधनात अडकले.
दिनेश कार्तिक हिंदू आहे तर, दीपिका ख्रिश्चन, त्यामुळे त्या दोघांनी दोन्हीही रिती प्रमाणे लग्न केलं आहे.