भारतीय क्रिकेटर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि त्याची आई रोहिनी (Rohini) यांनी मुंबईत आलिशान घर विकत घेतलं आहे. श्रेयस अय्यर आणि रोहिनी यांनी 525 स्क्वेअर फूटांचं हे अपार्टमेंट 2.9 कोटींमध्ये विकत घेतल्याचं वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिलं आहे.  Zapkey ने दिलेल्या रजिस्ट्रेशनच्या कागदपत्रांच्या आधारे हे वृत्त देण्यात आलं आहे. रिपोर्टनुसार, 19 सप्टेंबर 2024 रोजी हा व्यवहार करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार आदर्श नगर परिसरातील त्रिवेणी इंडस्ट्रीयल सीएचएसएलच्या दुसऱ्या माळ्यावर हे अपार्टमेंट आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) इराणी कप 2024 साठी संघाची घोषणा केली आहे. अजिंक्य रहाणे Rest of India संघाविरोधातील सामन्यात संघाचं नेतृत्व करणार आहे.  लखनऊमधील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियममध्ये येथे 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान हा सामना खेळला जाणार आहे.  


अजिंक्य रहाणेने मुंबईच्या रणजी ट्रॉफीच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. दुलीप ट्रॉफी 2024 मध्ये वगळल्यानंतर आता तो पुन्हा एकदा संघाच्या कर्णधारपदी परतला आहे. त्याच्यासोबत सलामीवीर पृथ्वी शॉ आहे, जो काउंटी चॅम्पियनशिपमध्ये यशस्वी कामगिरी केल्यानंतर कामगिरीतील सातत्य राखण्यास सज्ज आहे. 


श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ दोघांसाठीही हा सामना महत्त्वाचा असणार आहे. चांगली खेळी करत पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. श्रेयस अय्यर कसोटी क्रिकेटमध्ये संघर्ष करत असल्याने त्याला संघातून वगळण्यात आलं आहे. चांगल्या कामगिरीच्या आधारे भारतीय संघात पुन्हा प्रवेश कऱण्याची त्याची अपेक्षा असेल. 


मुंबईच्या संघाला मुशीर खान सारख्या तरुण खेळाडूंनीही बळ दिलं आहे, ज्याने अलीकडेच आपल्या कामगिरीने दुलीप करंडक जिंकला. याशिवाय सिद्धेश लाड आणि शम्स मुलाणी सारखे खेळाडूही आहेत. हार्दिक तामोरे आणि सिद्धांत अधातराव यांची दोन यष्टीरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे, तसंच दमदार गोलंदाजी अष्टपैलू शार्दुल ठाकूर कसोटी क्रिकेटमध्ये परतला आहे, जो आगामी बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेसाठी भारताच्या प्लॅन्समध्ये स्थान मिळवू शकतो.


सरफराज खान आणि शिवम दुबे यांना जर भारतीय संघातून रिलीज करण्यात आलं तर ते देखील संघात सामील होऊ शकतात. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पुष्टी केली की बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारताच्या संघाचा भाग असलेल्या सरफराजची कसोटीसाठी निवड न झाल्यास त्याला इराणी चषक स्पर्धेत मुंबईकडून खेळण्यासाठी सोडण्यात येईल.


"मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ निवड समितीने इराणी चषकासाठी एक मजबूत संघ निवडला आहे. सरफारज खान आणि शिवम दुबे भारताच्या कर्तव्यातून मुक्त झाल्यास संघात सामील होतील," असं एमसीएने एका निवेदनात जाहीर केलं.