Shubman Gill health update : भारतीय संघाचा स्टार सलामीवीर फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) याला डेंग्यूची लागण झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अशातच आता त्याला डिस्चार्ज मिळाल्याची माहिती समोर आली आहे. शुभमन गिल वर्ल्डकपमधील (ICC Cricket World Cup) पहिल्या सामन्यात म्हणजेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपलब्ध नव्हता. त्यानंतर डेंग्यूमुळे प्लेटलेटची (Dengue) संख्या 100,000 पेक्षा कमी झाल्याने शुभमनला चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात दाखल (health update) करण्यात आलं होतं. अशातच आता शुभमन गिल अफगाणिस्तान तसेच पाकिस्तानविरुद्धचा सामना देखील खेळणार नसल्याची शक्यता आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुभमनच्या आरोग्याची परिस्थिती पाहता 14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत विरूद्ध पाकिस्तान या सामन्यामध्ये शुभमन गिल (Shubman Gill) खेळणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.  वैद्यकीय तज्ज्ञांचं पथक त्याच्या आरोग्यावर लक्ष ठेऊन आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे डॉक्टर रिझवान खान सध्या टीमसोबत प्रवास करत असून शुभमनच्या तब्येतीवर देखील लक्ष ठेऊन आहेत.


शुभमनची तब्यत कशी?


प्लेटलेटची संख्या 70,000 पर्यंत घसरली आणि डेंग्यूच्या रूग्णांच्या बाबतीत, संख्या 100,000 पेक्षा कमी झाली की, खबरदारीचा उपाय म्हणून तुम्हाला वैद्यकीय सुविधेत दाखल केलं जातं. रविवारी रात्री शुभमनला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्याला सोमवारी संध्याकाळी सोडण्यात आलंय, अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सुत्रांना दिली आहे. 


शुभमन गिल अफगाणिस्तानविरुद्ध खेळू न शकल्यास टीम इंडियाला हा मोठा धक्का असणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी गिल (Shubman Gill) मैदानात उतरणार की नाही? यावर अजून प्रश्नचिन्ह कायम आहे. 14 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तानादरम्यान महत्त्वाचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. 


शिखर धवन की यशस्वी जयस्वाल?


शुभमन गिलच्या तब्यतीत सुधारणा झाली नाही तर त्याच्या जागी कोणा एका खेळाडूला संघात संधी द्यावी लागेल. संघात लेफ्ट हँडर कमी असल्याने शिखर धवन किंवा यशस्वी जयस्वालला संधी मिळू शकते. मात्र, येत्या काळात शुभमन गिल ठणठणीत होईल, अशी शक्यता आहे.