Smrita Mandhana Palash Muchhal Love Story: पुन्हा एकदा कॉमेडीचा तडाका घेऊन प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) याचा 'काम चालू है' हा सिनेमा (Kaam Chalu hai) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा पहिला पोस्टर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्वांची प्रतिक्षा शिगेला पोहोचली आहे. अशातच सिनेमामध्ये जरी राजपाल यादव झळकणार असला तरी चर्चा मात्र स्मृती मानधनाची (Smrita Mandhana) सुरू असल्याचं पहायला मिळतंय. त्याचबरोबर आता सांगली कनेक्शन समोर आल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजपाल यादवच्या 'काम चालू है' सिनेमाच्या चित्रिकरणाला सांगलीत सुरुवात झाली आहे. मात्र, फोटोत दिसणारी मराठमोळी क्रिकेटपटू आणि महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिची चर्चा मात्र जोरदार सुरू असल्याचं पहायला मिळतंय. त्याला कारण सिनेमाचा दिग्दर्शक संगीतकार पलाश मुच्छल (Palash Muchhal). गेल्या अनेक वर्षापासून पलाश आणि स्मृती एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. पलाश मुच्छल कोण? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. पलाश हा प्रख्यात गायिका पलक मुच्छलचा भाऊ आहे. नुकताच त्याचा एक फोटो समोर आला आहे.



'काम चालू है' या चित्रपटाचे लेखन, त्याचबरोबर दिग्दर्शन देखील पलाश मुच्छल करत आहे. स्मृती आणि पलाश यांची चांगली मैत्री असल्याचं समोर आलं होतं. दोघांच्या फॅमिली फंक्शनला एकमेकांची उपस्थिती असल्याचं दिसून आलंय. 'काम चालू है' चित्रपटाचे शूटिंगही स्मृतीच्या सांगली (Sangali) जिल्ह्यात होत असल्याने ती मित्राच्या आनंदाच्या क्षणात सामील झाली. मात्र, अनेकांनी दोघांच्या नात्यावरून भूवया उंचावल्या आहेत. 



दरम्यान, काम चालू है या सिनेमाचं संपूर्ण शुटिंग सांगली होणार असल्याची माहिती आहे. राजपाल यादवच्या फर्स्ट लुकमध्ये सांगलीचा फलक लागलेला दिसतोय. वाढदिवसादिवशी पलाशने त्याच्या हातावर 'SM 18' असा टॅटू गोंदवला होता. त्यामुळे स्मृती आणि पलाश डेट करत असल्याची जोरदार चर्चा झाली. त्याचबरोबर स्मृती आणि पलाशचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामुळे आता चर्चांना देखील उधाण आलंय.