टी-20 वर्ल्ड कपदरम्यान भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूचं दुख:द निधन!
रेल्वे क्रिकेटचे `गॉडफादर` म्हणून ओळखले जाणाऱ्या क्रिकेटपटूचं निधन!
Sport News : देशांतर्गत क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू आणि रेल्वे क्रिकेटचे 'गॉडफादर' म्हणून ओळखले जाणाऱ्या सय्यद हैदर अली यांचे निधन (Syed Haider Ali Death) झालं आहे. वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वामध्ये मोठी शोककळा पसरली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते प्रदीर्घ आजाराने आजारी होते. (Indian cricketer Syed Hyder Ali passed away latest marathi News)
सय्यद हैदर अली यांनी 1963-64 हंगामात रेल्वेसाठी प्रथम श्रेणी पदार्पण केल होतं. जवळपास 25 वर्षे ते रेल्वेसाठी खेळले. 113 प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये अली यांनी 366 विकेट घेतल्या. तीन वेळा 10 विकेट घेतल्या आणि 25 वेळा पाच विकेट घेतल्या होत्या. त्यांच्या पश्चात सय्यद शेर अली आणि रझा अली ही दोन मुले आहेत. हैदर अली डावखुरे फिरकीपटू होते मात्र ते भारताकडून कधीही खेळू शकले नाहीत.