मुंबई : क्रिकेट विश्वात सिक्सर किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू युवराज सिंग क्रिकेट विश्वाला अलविदा करणार असल्याचं कळत आहे. सोमवारी मुंबईत बोलवलेल्या एका पत्रकार परिषदेत तो याविषयीची घोषणार करणार असल्याचं कळत आहे. युवीने हा निर्णय घेतल्यास त्यांच्या चाहत्यांमध्ये निराशेचं वातावरण दिसेल यात शंका नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघाला २०११चा एकदिवसीय विश्वचषक आणि २००७ टी२० विश्वचषक जिंकवून देण्यात त्याचं मोलाचं योगदन होतं. २०११ विश्वचषकात दमदार कामगिरी करत तो संघाच्या विजयातील मुख्य शिल्पकार होता. याच प्रशंसनीय खेळाच्या बळावर २०११ विश्वचषक स्पर्धेतच त्याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं होतं.  


करिअर अगदी यशाच्या परमोच्च शिखरावर असतानाच युवराजला कर्करोगाचं निदान झालं आणि त्यानंतर परदेशात जाऊन त्याने या आजारावर उपचार घेतले. पुढे जाऊन या आजारपणातून सावरत त्याने क्रिकेच्या मैदानावर पुनरागमनही केलं. पण, २०१७ नंतर मात्र त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात स्थान मिळवला आलं नाही. २०१२ मध्ये त्याने अखेरची कसोटी खेळली. तर, अखेरचा एकदिवसीय आणि टी२० सामना २०१७ मध्ये खेळला होता. 


दरम्यान, युवी येत्या काळात परदेशी क्रिकेट लीगमध्ये सहभागी होऊन क्रिकेटचा खेळ खेळणार असल्याचं कळत आहे. सहसा क्रिकेट खेळाडू स्वत:हून पत्रकार परिषदेचं नियोजन करत नाहीत. त्यामुळे युवराज या पत्रकार परिषदेत त्याच्या निवृत्तीची घोषणा करणार असल्याची दाट शक्यता आहे. 


युवीच्या खेळाची आकडेवारी.... 


४० कसोटी सामने 
३०४ एकदिवसीय सामने 
५८ टी२० सामने 


कसोटी सामन्यांतील कामगिरी


४० सामने 
१९०० धावा 
१००/ ५०- ३/ ११ 
सर्वोत्तम खेळी १६९ धावा 
३३.९२ सरासरी


एकदिवसीय सामन्यांतील कामगिरी


३०४ सामने 
८७०१ धावा 
१००/५०- १४/५२
सर्वोत्तम खेळी १५० धावा 
३६.५५ सरासरी


टी२० सामन्यातील कामगिरी 


५८ सामने 
११७७ धावा 
१००/५०- ०/८
सर्वोत्तम खेळी ७७ धावा 
सरासरी २८.०२