भारतीय चाहत्याने सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियन तरुणीला केलं प्रपोज अन्...
भारतीय तरुणाने मैदानावर केलं ऑस्ट्रेलियन तरुणीला प्रपोज
सिडनी : क्रिकेट स्टेडियम हे क्रिकेटर्ससाठी सर्वात सुंदर स्थान आहे, परंतु असेही काही क्रिकेटप्रेमी आहेत ज्यांना त्यांचे सुंदर क्षण क्रिकेट स्टेडियमवर घालवायला आवडतात. सिडनी क्रिकेट मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसर्या वनडे सामन्यात असेच घडले. जेव्हा एका भारतीय चाहत्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमच्या महिला चाहतीला प्रपोज केलं.
भारतीय टीमची बॅटींग सुरु असताना 21 व्या ओव्हरदरम्यान स्टेडियममध्ये एका भारतीय चाहत्याने ऑस्ट्रेलियाच्या चाहतीला प्रपोज केलं. मुलाने रिंगसह गुडघ्यावर बसून या तरुणीला प्रपोज केलं. त्या मुलीने मुलाला मिठी मारली आणि होय मध्ये उत्तर दिले.
हा सुंदर क्षण पाहून ऑस्ट्रेलियन संघाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलसह सर्व खेळाडूंनी टाळ्या वाजवल्या. मुलाची आणि मुलीची बॉडी लँग्वेज पाहिल्यास असे वाटते की दोघे एकमेकांना ओळखतात. या दोघांनाही कोणाकडूनही फोटो किंवा व्हिडिओ बनवण्यासाठी सांगण्याची गरज पडली नाही. कारण बरेच कॅमेरे त्यांच्यावर गेले.