नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाने एका रोमांचक सामन्यात नेदरलॅंडचा 4-3 असा पराभव केला. भारतीय संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग विजयाचा हिरो ठरला. मनप्रीतने दोन गोल केले. 30 व्या आणि 44 व्या मिनिटाला त्याने गोल केले. तर वरुण कुमारने 17 व्या आणि हरजीत सिंगने 49 व्या मिनिटाला गोल करत विजय मिळवला. जगातील चौथ्या क्रमांकाच्या नेदरलँड टीमने गेल्या आठवड्यात जर्मनीचा 7-1 ने पराभव केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉब डी वुड नेदरलँडकडून २ तर मिंक व्हॅनने १ गोल केला. भारताने चांगली सुरुवात केली. रमणदीप सिंगला सुरुवातीलाच गोल करण्याची संधी मिळाली पण तो गोल करु शकला नाही. नेदरलॅंडच्या विर्डनने 5 व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकमध्ये पहिला गोल केला. त्यानंतर लगेचच मनप्रीतने उत्तम खेळी करत १७ व्या मिनिटाला गोल केला. भारताने आक्रमक खेळ केला.


मनप्रीतने 30 व्या मिनिटाला 2-1 अशी भारताला आघाडी मिळवून दिली. नेदरलँड्स देखील सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले पण अमित रोहिदासने भारतावर त्याचा काहीही परिणाम नाही होऊ दिला. कर्णधार मनप्रीतने पुन्हा एक गोल करत भारताला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली. मग हरजीत सिंगने आणखी एक गोल करत 4-1 ने भारताला मोठी आघाडी दिली. शेवटच्या १० मिनिटात नेदरलँडकडून देखील आक्रमक खेळी झाली आणि त्यांनी २ गोल केले पण शेवटी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.