आजही या खेळाडूच्या सीटवर कोणताच भारतीय क्रिकेटर बसत नाही
या दिग्गज खेळाडुच्या सीटवर कोणीच बसत नाही.
मुंबई : महेंद्र सिंह धोनी हा गेल्या अनेक दिवसांपासून मैदानापासून दूर आहे. त्याची कमी टीम इंडियाला निश्चितच जानवते. बीसीसीआयने टीम इंडियाचा खेळाडू युजवेंद्र चहल यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. टीम इंडिया तिसऱ्या टी२० सामन्यासाठी बसमधून ऑकलंड येथून हॅमिल्टनला जात असताना युजवेंद्र चहलने टीम इंडियाची मुलाखत घेतली.
युजवेंद्र चहलने या व्हिडिओमध्ये म्हटलं की, टीम इंडिया महेंद्र सिंह धोनीची आठवण काढते. चहल बसमध्ये एमएस धोनीच्या कोपऱ्यात असलेल्या सीटवर जातो. तेव्हा तो सांगतो की, 'ही ती सीट त्यांची आहे जेथे एक दिग्गज खेळाडू बसतो. माही भाई... येथे आजही कोणी बसत नाही. आम्ही त्यांना खूप मिस करतो.'