आयपीएलमध्ये पांड्या ब्रदर्सची होणारी ताटातूट टळली...
आयपीएल लिलावात ऑलराउंडर क्रुणाल पांड्याची बोली ८.८० कोटी रुपयांपर्यंत गेली. मात्र...
नवी दिल्ली : आयपीएल लिलावात (IPL Auction 2018) ऑलराउंडर क्रुणाल पांड्याची बोली ८.८० कोटी रुपयांपर्यंत गेली. मात्र मुंबई इंडियन्सच्या मालकीन नीता अंबानींनी आरटीएमचा वापर करत या ऑलराउंडर खेळाडूला आपल्या टीममध्ये ठेवण्यात सफल झाल्या. क्रुणालला खरेदी करण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरनेही बोली लावली. पण जेव्हा बोली ८.८० कोटींपर्यंत पोहचली तेव्हा मुंबई इंडियन्सने आरटीएमचा प्रयोग करत याच किंमतीत या क्रिकेटरला आपल्या टीममध्ये घेतले.
क्रुणाल टीममध्ये आल्याने नीता अंबानी खूश
बॅटींग आणि बॉलिंग दोन्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने करणारा खेळाडू क्रुणाल आपल्या टीममध्ये आल्याने नीता अंबानी अत्यंत खूश झाल्या. क्रुणाल त्यांना त्यांच्या टीममध्ये हवा असल्याचे नीता अंबानींच्या चेहऱ्यावरील हावभावावरून दिसत होते. खास गोष्ट ही की, हार्दीक पांड्या देखील मुंबई इंडिय़न्सच्या वतीने खेळणार आहे. गेल्या सीजनमध्ये या दोन्ही भावांनी दमदार कामगिरी केली होती.
आयपीएलमध्ये अत्यंत यशस्वी
आतापर्यंत क्रुणाल आयपीएलमध्ये अत्यंत यशस्वी ठरला आहे. क्रुणाल आयपीएलचे दोन सीजन्स खेळला आहे. ज्यात तो एकूण २५ मॅचेस खेळला. ज्यात सुमारे त्याने ३७ अॅव्हरेजने ४८० रन्स केले. याचा स्ट्राईक रेट १६० होता. इतकंच नाही तर IPL मध्ये क्रुणाल पांड्या १६ विकेट्सही घेतल्या आहेत.
क्रुणालच्या लग्नसोहळ्यालाही अंबानी कुटुंबियांची उपस्थिती
अलिकडेच क्रुणाल पांड्या त्याची मैत्रिण पंखुरी शर्मासोबत विवाहबंधनात अडकला. या सोहळ्याला अनेक क्रिकेटर्ससह अंबानी परिवार उपस्थित होते. इंडियन टीमचा कर्णधार विराट कोहलीच्या रिसेप्शनलाही संपूर्ण अंबानी परिवार सहभागी नव्हते. पण क्रुणालच्या लग्नाला मात्र मुकेश अंबानी आणि नीता अंबानी मुलांसह पोहचले होते.