T20 World Cup : टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने दोन सामने जिंकले असून तिसऱ्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेकडून पराभव झाला होता. भारतीय संघाच्या पराभवामुळे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान संघाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे भारत विजयी होण्यासाठी पाकिस्तानचे चाहतेही सामन्यावेळी आलेले दिसले. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे माजी खेळाडू सलीम मलिकने भारतीय संघावर मोठा आरोप केला आहे. (Indian team deliberately lost match against South Africa in T20 World Cup alleged former Pakistan player Marathi Sport News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना जाणूनबुजून गमावला. पाकिस्तानने उपांत्य फेरी गाठू नये, अशी भारताची इच्छा आहे, त्यामुळेच त्यांनी हा सामना गमावल्याचं सलीम मलिक यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानने टी-20 विश्वचषकासाठी पात्र व्हावे, असं भारतीय संघाला कधीच वाटणार नाही. संघाने अनेक झेल सुटले आणि संघाने अनेक संधी गमावल्या. क्षेत्ररक्षण चांगले झाले असते तर भारतीय संघ सामना जिंकू शकला असता, असंही सलीम मलिक म्हणाला.


दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची फलंदाजी जितकी वाईट होती तितकीच संघाची क्षेत्ररक्षणही वाईट होती. या सामन्यात संघाचे अनेक झेल सुटले. खुद्द विराट कोहलीने एक सोपा झेल सोडला. याचा परिणाम असा झाला की टी-20 विश्वचषकामधील टीम इंडियाला पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलं.


दरम्यान, ग्रुप 'ए'मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ  5 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. त्या पाठोपाठ भारत आणि बांगलादेश 4 गुणांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे. भारताचा 2 नोव्हेंबरला दुसरा सामना असून त्यावर भारताचं भवितव्य ठरणार आहे.