मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या शेवटची टेस्ट सुरु आहे. यानंतर वनडे सिरीजला सुरुवात होणार आहे. वनडे सिरीजसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. ४ सामन्यांच्या टेस्ट सीरीजमध्ये भारत २-१ ने पुढे आहे.  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ सामन्य़ांची वनडे सिरीज १२ जानेवारीपासून सुरु होत आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरीजमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष असेल. टी-२० सीरीजमधून भारताचा माजी कर्णधार धोनीला संघात जागा मिळाली नव्हती. वनडेमध्ये ऋषभ पंतसह ३ आणखी चांगल्या खेळाडूंना संघात जागा मिळालेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वनडे सीरीजमध्ये भारतीय टीमचा विकेटकीपर ऋषभ पंत यांच्यासह मनीष पांडे आणि उमेश यादव यांना देखील संघात जागा मिळालेली नाही. यांना वेस्टइंडिजविरुद्ध वनडे आणि टी२० सिरीजसाठी संधी देण्यात आली होती. दुसरीकडे युवराज सिंगला संघात जागा मिळेल असं अनेकांना वाटत होतं. रणजी ट्रॉफीमध्ये युवराजने चांगली कामगिरी केली. त्यामुळे त्याला संघात जागा मिळेल अशी त्यांच्या चाहत्यांना आशा होती. 


अधिक वाचा :मैदानावर ढोल वाजवत भारत आर्मीने पंतसाठी गायलं खास गाणं


दिनेश कार्तिकची वापसी


भारतीय टीमचा विकेटकीपर महेंद्र सिंह धोनीसह वनडे सिरीजमध्ये दिनेश कार्तिकला देखील घेण्यात आलं आहे. ऋषभ पंतच्या ऐवजी दिनेश कार्तिकला घेण्यात आलं आहे. 


अधिक वाचा : पंत ठरला ऑस्ट्रेलियामध्ये शतक ठोकणारा पहिला आशियाई विकेटकीपर


भारतीय टीम:


विराट कोहली ( कर्णधार ), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, अंबाती रायुडु, दिनेश कार्तिक, महेंद्र सिंह धोनी, केदार जाधव, रविंद्र जडेजा, यूजवेंद्र चहल, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि खलील अहमद.