World Cup 2023, Indian Team Jersey : फक्त 2 आठवड्यावर असलेल्या वर्ल्ड कपसाठी आता जोरात तयारी सुरू असल्याचं पहायला मिळतंय. भारतातील 8 मैदानं वर्ल्ड कपच्या (World Cup 2023) कडव्या टक्करसाठी तयार झाली आहेत. अशातच सर्वांना प्रतिक्षा लागलीये ती पहिल्या सामन्याची. वर्ल्ड कपचा पहिला सामना डिफेन्डिंग फायनलिस्ट इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) यांच्यात खेळवला जाणार आहे. येत्या 5 ऑक्टोबरला हा सामना होईल. तर टीम इंडियाचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला खेळवला  जाणार आहे. अशातच आता टीम इंडियाची जर्सी (Team India World Cup Jersey) लाँग करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी आदिदासने (Adidas) टीम इंडियाच्या नवीन जर्सीचे अनावरण केलंय. '3 का ड्रीम' या गाण्याद्वारे बहुप्रतिक्षित जर्सी रिलीज करण्यात आली. यामध्ये मेन इन ब्ल्युचे खेळाडू दिसत आहेत. खांद्यावर तिरंग्याची (Tri Color) पट्टी असलेली जर्सी अधिकच आकर्षित दिसत आहे. (Indian Team New Jersey for World Cup 2023 Launched By Adidas With Tri Colored On Shoulders watch Video)


टीम इंडिया चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पाच वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाविरुद्ध भिडणार आहे. 8 ऑक्टोबर रोजी टीम इंडिया विजयाचा नारळ फोडेल अन् वर्ल्ड कप मोहिमेची सुरूवात करणार आहे. त्यानंतर 11 तारखेला अफगाणिस्तानशी दोन हात करावे लगातील. तर वर्ल्ड कपमधील सर्वात रोमांचक असा सामना 14 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळवला जाणार आहे.


पाहा Video



वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया -


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.