FIFA World Cup 2022: फुटबॉल वर्ल्डकपकडे साऱ्या जगाचं लक्ष लागून आहे. फीफा वर्ल्डकप 2022 (FIFA World Cup 2022) 20 नोव्हेंबरला सुरु होणार असून 18 डिसेंबरला अंतिम सामना असणार आहे. या स्पर्धेसाठी एकूण 32 संघांनी सहभाग आहे. कतार, सौदी अरब, इराण, जापान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया या संघांचा फुटबॉल स्पर्धेत वर्णी लागली आहे. या यादीत भारतीय संघाचं नाव नसल्याने अनेकांना प्रश्न पडला आहे. भारतीय संघ फीफा वर्ल्डकपमध्ये क्वालिफाय करण्यास अपयशी ठरला आहे. पण यापूर्वी 1950 मध्ये ब्राझीलमध्ये आयोजित वर्ल्डकपसाठी भारतीय संघानं क्वालिफाय केलं होतं. पण स्पर्धेत भाग घेऊ शकला नाही. 


या कारणासाठी फुटबॉल स्पर्धेत भाग घेऊ शकला नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय फुटबॉलपटूंना विना शूज फुटबॉल खेळण्याची सवय होती. फीफाच्या नियमानुसार खेळाडूंनी शूज घालूनच फुटबॉल खेळणं आवश्यक आहे. मात्र भारतीय खेळाडूंना शूज घालून फुटबॉल खेळण्याचा सराव नव्हता. त्यामुळे त्यांनी या स्पर्धेत भाग घेण्यास नकार दिला. त्यानंतर भारतीय संघ या स्पर्धेसाठी कधीही क्वालिफाय होऊ शकला नाही. फीफा रॅकिंगमध्ये भारतीय संघांची स्थिती दयनीय आहे. भारतीय संघ सध्या 106 व्या स्थानावर आहे. 


भारतीय संघ या स्पर्धेत सहभागी नसला तरी या खेळाचे लाखो चाहते भारतात आहेत. कोलकाता आणि केरळमध्ये फुटबॉल चाहत्यांची संख्या सर्वाधिक आहे. क्रीडारसिक लाइव स्ट्रीमिंग आणि स्पोर्ट चॅनेलवरून या खेळाचा आनंद लुटू शकतात. भारतीय वेळेनुसार फुटबॉल सामने रात्री 8.30, 9.30, 12.30, दुपारी 3.30 आणि संध्याकाळी 6.30 असणार आहेत.


वाका...वाका...! शकिरा, नोरा फतेही FIFA World Cup 2022 मध्ये करणार परफॉर्म, सामन्यासाठींचे तिकीट दर जाणून घ्या


 फिफा वर्ल्डकपच्या बक्षीसाची रक्कम जाहीर करण्यात आली आहे. यावेळी संपूर्ण विश्वचषकात वितरित करण्यात येणारी बक्षीस रक्कम 3585 कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये विश्वचषक विजेत्या संघाला सुमारे 342 कोटी रुपये मिळतील.