मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज शेवटची टी-२० मॅच रंगणार आहे. न्यूझीलंडला व्हाईट वॉश देण्याच्या इराद्याने विराटसेनेची टीम इंडिया मैदानात उतरेल. भारतीय संघानं टी-२० सीरिज याआधीच जिंकल्यानं टीम इंडियाचा पारडं जड मानलं जातं आहे. तर शेवटची टी-२० जिंकून सीरिजमधील शेवट गोड करण्याचा न्यूझीलंडचा प्रयत्न असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माउंट माउंगानुईमध्ये जोरात वारे वाहत असल्याने बॉलिंग करताना अडचणी येऊ शकतात. येथे खेळले गेलेल्या ५ ही सामन्यामध्ये आधी बॅटींग करणारी टीम जिंकली आहे. जर आज भारताने टॉस जिंकला तर विराट कोहली आधी बॅटींग करण्याचा निर्णय घेऊ शकतो. टीम इंडिया ५ सामने जिंकून इतिहास रचण्याची मोठी संधी आहे.


मागच्या २ ही सामन्यामध्ये न्यूझीलंडला सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. कर्णधार विराट कोहलीने सीरीज जिंकल्यानंतर म्हटलं होतं की, त्याची टीम विजयाचा हा सिलसिला कायम ठेवू इच्छिते. तिसऱ्या टी२० सामन्यामध्ये मोहम्मद शमीने ज्या प्रकारे शेवटची ओव्हर टाकून मॅस पुन्हा झुकवली. ते नक्कीच कौतुकास्पद होतं.


दुसरीकडे न्यूझीलंडचा सर्वात अनुभव बॉलर टिम साऊदी देखील काही खास करु शकला नाही. रोहित शर्माने २ सिक्स मारत सामना जिंकला होता. चौथ्या सामन्यात ही न्यूझीलंड ६ बॉलमध्ये ७ रन करु शकली नव्हती.


भारतीय टीमने चौथ्या सामन्यात रोहित शर्मा, मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजाला विश्रांती दिली होती. पण तरी देखील टीम इंडियाने सुपर विजय मिळवला होता.