मुंबई : भारतीय क्रिकेट संघात अतिशय कमी वेळातच आपली जागा भक्कम करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत Rishabh Pant च्या नावाचा समावेश होतो. फक्त मैदानावरच नव्हे, तर मैदानाबाहेरही पंत प्रसिद्धीझोतात असतो. मग त्याचे बदलणारे लुक असो किंवा एखादी सोशल मीडिया पोस्ट. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सतत चर्चेत असणारा ऋषभ पंत त्याच्या आलिशान आणि तितक्याच लक्षवेधी राहणीमानासाठीही ओळखला जातो. सूत्रांच्या माहितीनुसार 2020 या वर्षभरात त्यानं 29.19 कोटी रुपयांची कमाई केली. फोर्ब्सच्या 2019 मधील 100 सेलिब्रिटींच्या यादीतही त्याच्या नावाला स्थान मिळालं. सूत्रांच्या हवाल्यातून मिळालेल्या माहितीनुसार 2021 पर्यंत त्याची संपत्ती 5 मिलियन डॉलर्सवर पोहोचली आहे. भारतीय परिमाणानुसार ही किंमत 36 कोटी रुपये इतकी होते. 




Rishabh Pant ची वार्षिक कमाई 10 कोटी रुपये असून, तो महिन्याला अंदाजे 30 लाख रुपये कमवतो. त्याचं घरही तितकंच आलिशान. भौमितिक आणि मोनोक्रोम आऊटलेटला त्याच्या घराच्या सजावटीत स्थान देण्यात आलं आहे. घरामध्ये त्यानं एक जिमही तयार करुन घेतली आहे. 


पंतकडे Merecedez, Audi A8 and Ford अशा कोट्य़वधींच्या घरात किंमत असणाऱ्या कार आहेत. त्याची क्रमवारी पाहायची झाल्यास बीसीसीआयच्या वार्षिक प्लेअर कॉन्ट्रॅक्टमध्ये तो अ श्रेणीमध्ये येतो. ज्यासाठी त्याला एका वर्षाचे 5 कोटी रुपये मिळतात.




प्रत्येक कसोटी सामन्यासाठी त्याला 3 लाख रुपये मिळतात. तर एकदिवसीय सामन्यासाठी त्याला 2 लाख रुपये मिळतात. प्रत्येक टी20 सामन्यासाठी त्याला 1.50 लाख रुपये मिळतात असं म्हटलं जातं. याव्यतिरिक्त दिल्ली कॅपिटल्स या आय़पीएलमधील संघातील योगदानासाठी त्याला 8 कोटी रुपये मिळतात.