लकमलने भारताच्या डावाला लावला `सुरंग`
भारत आणि श्रीलंका यांच्यात आजपासून सुरु झालेल्या वनडे सिरीजच्या पहिल्या सामन्यात भारताची अवस्था फारच बिकट झाली आहे.
धर्मशाला : भारत आणि श्रीलंका यांच्यात आजपासून सुरु झालेल्या वनडे सिरीजच्या पहिल्या सामन्यात भारताची अवस्था फारच बिकट झाली आहे.
श्रीलंकेने टॉस जिंकत आधी बॉलिंगचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या बाजुने आता ठरत आहे. भारताच्या २९ रनवर ७ विकेट पडल्या आहेत. शिखर धवनच्या रुपात भारताला पहिला धक्का बसला. ० रनवरच तो माघारी परतला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा देखील फक्त २ रनवर आऊट झाला.
टीम इंडियाची सुरुवातच खूप वाईट झाली. टीम इंडियाला ९ व्या ओव्हरला तिसरा झटका लागला. दिनेश कार्तिक सुरंगा लकमलचा शिकार झाला. कार्तिक देखील शून्यावर परतला. त्यानंतर मनीष पांडेच्या रुपात भारताला ४ था झटका लागला. पांडेला लकमलने अँजेलो मॅथ्यूजच्या हाती कॅच देण्यास मजबूर केलं. पांडे २ रनवर आउट झाला. पांचवा विकेट श्रेयस अय्यरचा पडला. नुवान प्रदीपने त्याला बोल्ड केलं. अय्यर 9 रनवर आउट झाला.
हार्दिक पंड्या १० रनवर आऊट झाला. 15.2 ओव्हरमध्ये नुवानच्या बॉलवर तो कॅच झाला. श्रीलंकेचा कर्णधार थिसारा परेराने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.