तिसऱ्या सामन्यात भारत पुनरागमन करेल- हरभजन सिंग
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेला भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक होतेय. पहिल्या दोनही कसोटी सामन्यात भारताला द. आफ्रिकेविरुद्ध पराभव सहन करावा लागल्याने त्यांनी कसोटी मालिका गमावलीये.
मुंबई : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेला भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक होतेय. पहिल्या दोनही कसोटी सामन्यात भारताला द. आफ्रिकेविरुद्ध पराभव सहन करावा लागल्याने त्यांनी कसोटी मालिका गमावलीये.
हरभजन सिंगने केलंय संघाचे समर्थन
भारताच्या या कामगिरीवरुन त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका होतेय. एकीकडे भारतीय संघावर टीका होत असताना भारताचा अनुभवी स्पिनर हरभजन सिंगने मात्र संघाची बाजू घेतलीये.
आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत भारत ०-२ने पिछाडीवर असला तरी तिसऱ्या सामन्यात ते पुनरागमन करतील असा विश्वास हरभजन सिंगने व्यक्त केलाय. प्रत्येक सामन्यात एक नवी संधी असते. तुम्ही जे झालंय ते बदलू शकत नाही. मात्र तुमच्या जे समोर आहे ते तुम्ही बदलू शकता, असे हरभजन म्हणाला.