IPL 2024: आयपीएलच्या प्रत्येक हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) संघाच्या चाहत्यांच्या अपेक्षा उंचावलेल्या असतात. आतापर्यंत एकदाही आयपीएल जिंकू न शकलेला आरसीबी संघ यावर्षी तरी हा दुष्काळ संपवेल अशी आशा चाहत्यांना असते. मात्र प्रत्येक हंगामात चाहत्यांच्या नशिबी फक्त निराशाच असते. प्रत्येक हंगमात आरसीबी संघ कमनशिबी आणि दुर्दैवी ठरत असतो. सोमवारी हैदराबादमधील चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये झालेल्या सामन्यातही बंगळुरु संघाला अशाच आणखी एका पराभवाचा सामना करावा लागला. सनरायजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) आयपीएलमधील सर्वोच्च 287 धावसंख्या उभारली होती. पाठलाग करताना बंगळुरुला 25 धावांनी पराभव स्विकारावा लागला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी झालेल्या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये 287 धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. धावांचा पाठलाग करताना दिनेश कार्तिक, विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसने दमदार खेळी केली. 288 धावांचा डोंगर ओलांडणं अतिशय अवघड असतानाही त्यांनी प्रयत्न केले. पण 25 धावांनी त्यांना पराभव स्विकारावा लागला. यासह त्यांच्या नाव सलग पाचव्या पराभवाची नोंद झाली आहे. आपल्या या प्रत्येक पराभवासह बंगळुरु संघ प्लेऑफपासून दूर जात आहे. सध्या गुणतालिकेत बंगळुरु संघ अखेरच्या स्थानी आहे. 


आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात तीन संघ एकदाही विजेतेपद पटकावू शकलेले नाहीत. यामध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यासह बंगळुरु संघाचा समावेश आहे. सोमवारीदेखील बंगळुरुच्या चाहत्यांची पुन्हा एकदा निराशा झाली. यानंतर भारताचा महान टेनिस खेळाडू महेश भूपती याने एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने आता आरसीबी संघ नव्या मालकाच्या हाती सोपवला पाहिजे असं स्पष्ट मत मांडलं आहे. 


“खेळ, आयपीएल, चाहते आणि अगदी खेळाडूंच्या भल्यासाठी बीसीसीआयने RCB ची विक्री करुन नव्या मालकाकडे सोपवणं आवश्यक आहे. जो इतर संघांप्रमाणेच स्पोर्टस फ्रँचायझी उभी करण्याची काळजी घेईल," अशी पोस्ट महेश भूपतीने केली आहे. #tragic असा हॅशटॅगही त्याने सोबत जोडला आहे. 



इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकल वॉगनने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत बंगळुरु संघात इतके मोठे खेळाडू असतानाही ते चांगले का खेळत नाहीत? असा प्रश्न विचारला होता. त्यानंतर आता महेश भूपतीने हे विधान केलं आहे. 


"मला बंगळुरु संघाबाबत एक गोष्ट आवडते ती म्हणजे त्यांनी टीम स्पोर्ट हा फक्त एकट्याचा खेळ नाही हे सिद्ध केलं आहे. तुम्ही मोठे खेळाडू विकत घेता त्यांना संघात स्थान देऊ शकता. पण याचा अर्थ तुम्ही जिंकणार असा होत नाही. बंगळुरु संघाने हेच सिद्ध केलं आहे," असं मायकलने म्हटलं होतं. 


"त्यांनी एबी डेव्हिलियर्स, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, प्लेसिस यांसारखे काही अविश्वसनीय खेळाडू संघात घेतले. पण जोपर्यंत तुम्ही संपूर्ण संघ कार्य करत नाही आणि प्रत्येक खेळाडू आपली भूमिका जाणून घेत नाही आणि ओळखत नाहीत तोवर तुम्हाला संघात थोडेसे बदल करावे लागतील जेणेकरुन एखाद्याची वेगळ्या स्थितीत भरभराट होऊ शकते. मला बंगळुरु संघ तसं करताना दिसत नाही,” तो पुढे म्हणाला.