मुंबई: देशात कोरोनाचं थैमान सुरू आहे. दुसऱ्या लाटेत अनेका क्षेत्रातील नामवंत व्यक्तींपासून ते आपल्या आजूबाजूच्या घरापर्यंत कोरोनाने अनेक लोकांना गमवलं आहे. IPLवरही कोरोनाचं संकट असल्याने तात्पुरती स्थगित करण्याची वेळ आली आहे. महिला क्रिकेट संघातील एका खेळाडूवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्ती तिच्या आयुष्यातील दु: ख संपवण्याचे नाव घेत नाही. आधी कोरोनामुळे आईचं छत्र हरपलं आणि आता बहिणीनेही साथ सोडली आहे. कोरोनामुळे वेदाची बहिण वत्सला शिवकुमारचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दोन आठवड्यापूर्वी वेदाच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. 


35 वर्षीय वत्सला यांचं बुधवारी रात्री उपचारादरम्यान चिक्कमंगलुरू इथल्या रुग्णालयात मृत्यू झाला. वेदाच्या आईचा दोन आठवड्यांपूर्वीच कोरोनामुळे मृत्यू झाला होता. वेदाने 24 एप्रिलला त्याची माहिती ट्वीट करून दिली होती. 


वेदाने 48 एकदिवसीय अंतरराष्ट्रीय तर 76 टी 20 सामने खेळले आहेत. कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेमुळे भारताला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागलं आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज तीन लाखाहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. महत्वाची औषधे आणि ऑक्सिजन नसल्यामुळे हे संकट अधिकच वाढले आहे. यामुळे दररोज हजारो लोक आपला जीव गमावत आहेत.