नवी दिल्ली : क्रीडा जगतात आपल्या खेळाच्या बळावर दमदार कामगिरी करणारी आणि थेट रुपेरी पडद्यापर्यंत जिच्या कारकिर्दीने मजल मारली अशी खरीखुरी 'दंगल गर्ल' म्हणजेच कुस्तीपटू बबिता फोगट हिच्या जीवनात आता एल नवं वळण येणार आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपच्या साथीनं राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणारी बबिता येत्या काही दिवसांमध्ये लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खुद्द बबितानेच याविषयीची माहिती दिली. १ डिसेंबरला चरखी दादरी येथील बलाली या गावी हरयाणवी पद्धतींनुसार हा विवाहसोहळा पार पडेल. ज्यानंतर २ डिसेंबरला दिल्लीमध्ये एका दिमाखदार स्वागत सोहळ्याचं आयोजन करण्यात येणार आहे.  


मुळच्या नजफगढ येथे राहणाऱ्या विवेक सुहाग याच्याशी बबिता विवाहबंधनात अडकणार आहे. विवेक हासुद्धा कुस्तीच्या खेळात सक्रीय आहे. बबिताच्या लग्नाची माहिती समोर येताच क्रीडाक्षेत्रातून आणि मित्रपरिवारातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. आपल्या या विवाहसोहळ्यासाठी बबिता क्रीडा आणि कला क्षेत्रातील अनेक दिग्गजांना आमंत्रित करणार आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनासुद्धा तिच्या लग्नाचं निमंत्रण असेल असंही तिने स्पष्ट केलं. 




रविवारी गीताने दादरी येथील भाजप पक्ष कार्लायलयात कार्यकर्त्यांची भेट घेतली त्याचवेळी तिने ही अत्यंत महत्त्वाची बाब समोर ठेवली. 'जीवनात मी एका नव्या प्रवासाची सुरुवात करत आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाची मला गरज आहे. तुम्ही सर्वजण माझ्या लग्नासाठी आमंत्रित आहात', असं बबिता म्हणाली. आपल्या या नात्याविषयी फार गोष्टी उघड न करता, विवेकला पहिल्यांदा २०१४ मध्ये एका कार्यक्रमादरम्यान भेटल्याचं तिने सांगितलं. पहिल्या भेटीनंतर जवळपास पाच वर्षे हे नातं आकारास आणल्यानंतर त्यांनी यंदाच्या वर्षी जून महिन्यात लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला.